Maharashtra

लाॕकडाऊन आणि खाकीतील माणुसकी..पो नि अंबादास मोरे व कर्मचारी यांनी दिले गरीब महिलांना अन्न

लाॕकडाऊन आणि खाकीतील माणुसकी..पो नि अंबादास मोरे व कर्मचारी यांनी दिले गरीब महिलांना अन्न

प्रतिनिधी नूरखान

लाॕकडाऊन मध्ये माणूसकीचे घडले दर्शन…!

सध्या अमळनेर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 144 कलम लागू आहे. संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवत,कायदा आणि सुव्यवस्था आबादीत। ठेवण्याची संपुर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे.अश्या परिस्थिती तही खूप ताण असतांना कामाची खूप मोठी जबाबदारी खांद्यावर असतांना देखील अमळनेर शहरातील खाकीतील माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय येतो आहे. एक दबंग अधिकारी ते एक अत्यन्त मनमिळावू ,समजूतदार ,शांत,आध्यत्मिक व्यक्तिमत्त्व म्हणजे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे आहेत.आज पर्यंत अनेक अधिकारी या शहरात आले अनेकांनी कामेही केली.परंतु खूप कमी अधिकारी जनतेच्या लक्षात राहतात आणि मनात घर करून राहतात.त्यापैकीच एक आहेत पोलीस निरीक्षक अंबादास मोरे…

पो. नि. अंबादास मोरे व कर्मचारी वाडी संस्थान दर्शन आटोपून दगडी दरवाजाकडे जात असतांना मध्ये अगदी परिस्थिती असलेले लहान मुले, मुली, स्रीया जात असतांना पोलीस गाडी पाहुन घाबरून पळायला लागले.

परंतु त्यांना थांबवून साहेबांनी गाडीतील गोडशेव,चिवडा असे पाकीट सगळ्यांना दिले यातुन कर्तव्य दक्ष मोरे साहेबांनी माणूसकीचे दर्शन घडविले. मनोज माळी यांनी हे पाहुन फोटो व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे व भरत यांना पाठवले. त्यांनी हि माहीती दिले अहोरात्र कोरोनाचा महासंकटाला झुंज देणारे अमळनेर पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी पो कॉ मधुकर पाटील।पो कॉ बागुल,पो कॉ संजय पाटील इ उपस्थित होते.

लाॕकडाऊन आणि खाकीतील माणुसकी..पो नि अंबादास मोरे व कर्मचारी यांनी दिले गरीब महिलांना अन्न

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button