Kolhapur

कोजिमाशिच्या कागल शाखेत नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार

कोजिमाशिच्या कागल शाखेत नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार

सुभाष भोसले कोल्हापूर

कागल : माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणाऱ्या दादा लाड यांच्या नेतृत्वावर सभासदांचा विश्वास दृढ असल्याने कोजिमाशि संस्थेने राज्यात गौरवास्पद प्रतिमा निर्माण केली आहे. राज्यातील शिक्षकांच्या पतसंस्था कोजिमाशिचा आदर्श मानून कार्य करतात यामध्येच लाड सरांचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित होते. असे प्रतिपादन कोजिमाशी कागल शाखेचे अध्यक्ष अरविंद किल्लेदार यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था (कोजिमाशि ) च्या कागल शाखेत नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी व्ही.डी. मगदूम होते. यावेळी बानगे ( ता. कागल) येथील कॉ.जीवनराव सावंत श्रमिक विद्यालयचे मुख्याध्यापक झाल्याबद्दल शाखा चेअरमन अरविंद किल्लेदार व यशवंतराव घाटगे हायस्कूलचे मुख्याध्यापक झाल्याबद्दल व्ही.डी. मगदूम यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत शाखाधिकारी अनिल पाटील यांनी केले आभार प्रशांत मोरबाळे यांनी मानले. श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉंलजचे उपप्राचार्य बी.के. मडिवाळ यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी शाखा सदस्य विश्वास धुरे, सखाराम पाटील, संदीप गुरव, नरेंद्र बोते तसेच संग्राम भोसले, विजयकुमार खराटे, रावसाहेब गावडे, प्रशांत गुरव आदी उपस्थित होते.
कागल : कोजिमाशिच्या कागल शाखेत सत्कारमूर्ती शाखा चेअरमन अरविंद किल्लेदार, व्ही.डी. मगदूम आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button