Bollywood

Mollywood Stories: बॉलिवूडला धडकी भरवणारे “दादा”… आज ह्या पांडू हवालदारची जयंती… जाणून घ्या सोंगड्याचा जीवनपट…

Mollywood Stories: बॉलिवूडला धडकी भरवणारे “दादा”… आज ह्या पांडू हवालदारची जयंती… जाणून घ्या सोंगड्याचा जीवनपट…

मराठी सिनेमांना व्यावसायिक यश नाही, सिनेमा चालला तर चालला…अशी सगळी जर-तरची भाषा असताना चार दशकांहून अधिक काळ या सर्व तर्कांना उडवून लावत मराठीतला एक महानायक दिमाखात थिएटरमध्ये झळकला. त्याचा सिनेमा लागला, की ओस पडलेली थिएटर्स काही मिनिटांत भरत असायचे. या महानायकाचं नाव आहे दादा कोंडके. दादा कोंडके यांची आज जयंती. विनोदाचे बादशहा व महानायक दिवंगत दादा कोंडके यांचा चाहता वर्ग आजही मोठा आहे.भाषेच्या जोरावर त्यांनी केलेल्या असंख्य विनोदांनी प्रेक्षकांना वेडं केलं. अगदी दोन वर्षांपर्यंत दादांचे सिनेमे राज्यातल्या अनेक थिएटर्सवर लागत असायचे. अशा या सुपरस्टारची आज जयंती...

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट १९३२ – १४ मार्च १९९८) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात.

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. ‘अपना बझार’ मध्ये काम करता करता दादा सेवादलाकडे आकर्षित झाले.

दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे. ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरात – “बॅंडवाले दादा” ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.
दादा कोंडके हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. दादांचे सिनेमे द्विअर्थी संवादांसाठी लोकप्रिय होते, सिनेमातल्या डबल मिनिंग जोकमुळं अनेकदा त्यांच्यावर टीका व्हायची. दादांनी सेन्सॉर बोर्डालाही कोड्यात टाकलं होतं. टीका होत असली तरी त्यांच्या सिनेमांना तितकीच गर्दी देखील व्हायची. दादांचे ९ सिनेमे बॅक टू बॅक सिल्व्हर ज्युबली ठरले होते. त्याच्या लुकवरही अनेकदा बोललं जायचं. हाफ पॅंट, त्याला असणारी बाहेर लोंबकळणारी नाडी यावर प्रतिक्रिया यायच्या. पण दादांनी त्यात बदल केला नाही. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यानंतर ‘तांबडी माती’ या सिनेमासाठी भालजी पेंढारकर यांनी दादा कोंडकेंची निवड केली होती. पण सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण दादा या अपयशानं खचले नाहीत. त्यानंतर सोंगाड्या या सिनेमानं दादांचं आयुष्य बदललं. दादा सुपरस्टार झाले.

एक किस्सा
असं म्हणतात की, दादांचा सिनेमा लागला की, बॉलिवूडलाही धडकी भरायची. दादांचा सिनेमा असेल तर बॉलिवूड सिनेमे उशिराने प्रदर्शित केले जायचे. ‘एकटा जीव सदाशिव’ या सिनेमाचा एक किस्सा प्रचंड गाजला होता. या सिनेमाची इतकी हवा झाली होती की, राज कपूर यांना ऋषी कपूर यांना बॉलिवूडमध्ये लॉंच करायचं होतं. त्यांनी बॉबी सिनेमा केला. या सिनेमात ऋषी यांच्यासोबत डिंपल कपाडीया होत्या. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिखही ठरली होती. पण तेव्हाच दादांचा ‘एकटा जीव सदाशिव’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामुळं राज कपूर यांनी बॉबी या सिनेमाची तारिख पुढं ढकलली होती. त्यामुळं बॉबी सिनेमा ठरलेल्या तारखेच्या पाच महिन्यांनंतर प्रदर्शित झाला. इतकं करूनही राज कपूर यांनी दादांना ‘एकटा जीव सदाशिव’ हा सिनेमा थिएटरमधून उतरवण्याची विनंती केली होती.

मृत्यूच गूढ…

त्यांच्या मृत्यूचंही गूढ कायम आहे. मध्यंतरी टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका रिपोर्टमध्ये याबद्दल नोंदवले होते.
दादा कोंडके यांचा मृत्यू हा 14 मार्च 1998 साली पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी झाला होता. त्यावेळी ते रमा निवास, दादर येथे राहत होते. त्यांना त्यानंतर दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. डॉ. अनील वाकणकर यांनी त्यांना आदल्यादिवशीच तपासले होते. त्यावेळी त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर समोर आलं होतं की सुश्रुषाच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु अचानकपणे दादा कोंडके यांनी घरी नेण्यात आले होते. ली होती. असा हा किस्सा दादांचं स्टारडम सांगण्यासाठीही पुरेसा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button