Maharashtra

ब्राम्हणशेवगे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद प्रकरण: *जिल्हा आरोग्य अधिकारीची भेट

प्रतिनिधी सोनाथ माळी

ब्राम्हणशेवगे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद प्रकरण: *जिल्हा आरोग्य अधिकारीची भेट
ब्राम्हणशेवगे ता. चाळीसगाव
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेली अनेक दिवसापासून कर्मचारी नसल्यामुळे बंद आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपकेंद्र पुर्ववत सुरू करावे तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आशीर्वादाने उपकेंद्र बंद असल्याची तक्रार लोकसंघर्ष मोर्चा चे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी तक्रार केली आहे.त्यामुळे वृतपत्रामध्ये,नुज पोर्टवर तसेच सोशल मिडीयावर बातम्या प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ.पोटोळे जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांनी दि.५ एप्रिल रोजी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी डॉक्टर पोटोळे यांनी पंधरा दिवसांत आरोग्य उपकेंद्रास नविन डॉक्टर देण्याचे तसेच आरोग्य उपकेंद्र सुशोभिकरण करणे कामी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच आरोग्य सेविका फिरस्ती व्यतिरिक्त संपुर्ण वेळ उपकेंद्र ब्राम्हणशेवगे येथे सेवा देणार व वैद्यकीय अधिकारी शिरसगाव हे आठवड्यात अहवाल सादर करतील असे सागितले. याप्रसंगी ब्राम्हणशेवगे येथील रत्नाकर पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष मदन राठोड,पोलीस पाटील राजेंद्र माळी,जालिंदर बाविस्कर,सामाजिक कार्यकर्ते पिना दाभाडे,प्रभाकर पवार,प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव चे डॉ. प्रितम,डॉ.सैय्यद,संजय निकुभ,आरोग्य सेवक विकास सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button