Maharashtra

नंदुरबार शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांनी घाबरू नये, घरातच राहावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
नागरिकांनी घाबरू नये, घरातच राहावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक 10 भागातील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाच्या एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. नंदुरबार शहरातदेखील संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वॉरंटाईन केले असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 20 एप्रिलपर्यंत नंदुरबार शहरातील वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना (भाजीपाला, किराणा, पेट्रोलपंपसह) बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button