Maharashtra

उमरेड तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई नागपुर-उमरेड महामार्गावर पाचगाव पोलिस चोकीच्या समोर नाकाबंदी

प्रतिनिधी अनिल पावर

उमरेड तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई

नागपुर-उमरेड महामार्गावर पाचगाव पोलिस चोकीच्या समोर नाकाबंदी

चांपा: कोरोना’ चे संक्रमण रोखण्यासाठी कुही पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे .पोलिसांनी नागपुर उमरेड महामार्गावरिल पाचगाव पोलिस चौकीच्या समोर नाकाबंदी केली असून , संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिस कारवाई करीत आहेत .शिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मुभा दिली आहे .

उमरेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी , व लॉकडाऊनचे काटेकोर पालन , प्रशासनाकडून दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व विविध उपाययोजना करण्याचे आदेश कुही, उमरेड , भिवापुर, पोलिस स्टेशनला दिले .त्याअनुशंगाने कुही पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुर उमरेड महामार्गावरील पाचगाव पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली .असून तिथे प्रत्येकाला विचारपूस करून त्याची तपासणी केली जात आहे .घराबाहेर पडण्याचे कारण संयुक्तिक असल्यास त्याला सोडले जात असून , नसल्यास कारवाई केली जात आहे .या नाकाबंदीमुळे चंद्रपूर , ब्रम्हपुरी , चिमूर , वडसा , गडचिरोली आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे .अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी दिली .
गाव व परिसरात ठिकठिकाणी पोलिस तैनात असून , रोडवर दिसणाऱ्या प्रत्येकाला थांबवून विचारपूस केली जात आहे .गावांतील शासकीय दवाखाना , किराणा दुकान , मेडिकल स्टोअर्स , व भाजीपाल्याची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत .

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे , विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button