Mumbai

Mumbai Diary: स्वातंत्र्यदिनी रंगणार विशेष क्षमता असलेल्या कलाकारांची मैफल- नवी मुंबईकरांसाठी संगीताची पर्वणी

Mumbai Diary: स्वातंत्र्यदिनी रंगणार विशेष क्षमता असलेल्या कलाकारांची मैफल- नवी मुंबईकरांसाठी संगीताची पर्वणी

Atypical Advantage संस्थेचा पुढाकार

मुंबई स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सध्या देशभर उत्साहाचं वातावरण आहे. अनेक संस्था वेगवेगळे आणि अनोखे उपक्रम आयोजित करून स्वातंत्र्यदिनाची तयारी करत आहेत. अशातच नवी मुंबईत एक खास मैफल रंगणार आहे. या मैफिलीत विशेष क्षमता असलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यात गतीमंद-मतीमंद किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग कलाकार गायन, वादन करून लोकांचं मनोरंजन करतील आणि स्वातंत्र्ययोद्ध्यांना वंदन करतील. नवी मुंबईतील नेक्सस सीवूड मॉल आणि Atypical Advantage या संस्थेतर्फे १२ ऑगस्ट रोजी हा उपक्रम आयोजित केला आहे.

नवी मुंबईतील नेक्सस सिवूडस या सर्वाधिक गर्दी असलेल्या मॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक, कर्मचारी आणि इतर सर्व लोकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. याकरिता Atypical Advantage या संस्थेने देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. Atypical Advantage या संस्थेद्वारे शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना आणि कौशल्यांना वाव दिला जातो. संगीताद्वारे सर्वसमावेशकता साधण्याचा प्रयत्न नेक्सस सीवूड आणि Atypical Advantage एकत्रितपणे करणार आहेत.

typical Advantage चे गायक आपली कला सर्वांसमोर सादर करतील. दीपक बेडसा आणि नितीश सोनावणे हे दोन कलाकार उडान एण्टरटेन्मेंट या ब्रँडशी जोडले गेले असून दोघेही उत्तम गायक आणि पियानो-कीबोर्ड वादक आहेत. तेदेखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सणासुदीच्या प्रसंगी आम्ही असे उपक्रम आयोजित करण्यावर भर देतो. या उपक्रमांद्वारे समाजातील सर्वच घटकांमधील कलागुणांना वाव मिळावा, हा आमचा हेतू असतो. या विशेष मुलांमध्ये दडलेले कलागुण जगासमोर यावेत, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावं, यासाठीच आम्ही Atypical Advantage यांच्यासह हा उपक्रम राबवत आहोत. या मैफिलीची आठवण ग्राहकांच्याच नाही, तर आमच्याकडे असलेल्या दुकानदारांच्या मनातही कायमची गोंदली जाईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया नेक्सस सीवूडचे सीओओ जयेन नाईक यांनी दिली.

आमच्या कलाकारांसाठी ही खूप मोठी संधी असून या संधीचं सोनं करण्यासाठी आमचे सर्वच कलाकार तत्पर आहेत. सर्वसमावेशकता आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या आवाजाला, कलागुणांना तेवढंच महत्त्व आहे, ही बाब या उपक्रमाद्वारे अधोरेखित होईल, असं Atypical Advantage सहसंस्थापक गीतिका मेहता यांनी स्पष्ट केलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button