Bollywood

Mollywood: चित्रपट इतिहासात प्रथमच झुंड च्या ट्रेलरमध्ये शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची झलक… ट्रेलर प्रदर्शित…

Mollywood: चित्रपट इतिहासात प्रथमच झुंड च्या ट्रेलरमध्ये शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची झलक… ट्रेलर प्रदर्शित…

मुंबई नुकताच टी सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर ‘झुंड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित झाला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च ला सिनेमागृहात प्रकाशित होणार आहे. मराठी मधील प्रसिद्ध नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट आहे.

चित्रपटासाठी अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. ट्रेलर मधून अमिताभ बच्चन यांची फुटबॉल कोच ची भूमिका स्पष्ट होत आहे. चरस गांजा च्या विळख्यात अडकलेली पोरं कशी नॅशनल फुटबॉल टीम पर्यंत पोहचू शकतात, याचा एकंदरीत अंदाज ट्रेलर वरून आपणास पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद ‘झुंड’ सिनेमाच्या ट्रेलरसाठी मिळत आहे.या चित्रपटाद्वारे अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातील ट्रेलरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वर फुले शाहू यांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट चर्चेत आहे.
झुंड या चित्रपटाचा ट्रेलर ३ मिनिटांचा आहे. यात २.१२ मिनिटाच्या एका दृश्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली फ्रेम पाहायला मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले चित्रपटातील त्या दृश्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच

याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावेळी अमिताभ बच्चन यांचा डायलॉगही प्रचंड गाजत असल्याचे दिसत आहे. “एका दगडात ही पोरं जनावर मारतात. जर त्यांच्या हातात बॉल दिला तर ते जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होतील”, असा डायलॉग यावेळी अमिताभ बच्चन बोलताना दिसत आहे. दरम्यान सध्या प्रेक्षक या ट्रेलरचे कौतुक करताना दिसत आहेत.
झुंड हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सामाजिक संदेश लोकांना मिळणार आहे हे ट्रेलर पाहून समजते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे लोकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे.दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर कौतुक व अभिनंदन चा वर्षाव होत असून सोशल मीडियावर जबरदस्त पसंती मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button