Dhule

डॉ.हिरा पावरा ह्यांची समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य “राज्यव्यवस्थापक” व धुळे जिल्हा “कार्याध्यक्ष”पदी निवड

डॉ.हिरा पावरा ह्यांची समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य “राज्यव्यवस्थापक” व धुळे जिल्हा “कार्याध्यक्ष”पदी निवड

राहुल साळुंके धुळे

धुळे : समाजासाठी अहोरात्र जटणारे, समाजाचे आरोग्य असो अथवा सामाजिक आंदोलन, मोर्चे, उलगुलान असो ह्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले कर्तव्य चोख बजावणारे, धुळे जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी टीमचे डॉ.हिरा पावरा ह्यांची समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य ह्यांत राज्यव्यवस्थापक पदी व समुदाय आरोग्य अधिकारी संघटना धुळे जिल्हा ह्यांत कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्रात १३००० समुदाय आरोग्य अधिकारी महाराष्ट्रातील आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या न्यायहक्कासाठी ही संघटना कार्यरत असेल.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून २ समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांची नियुक्ती करण्यात आली असे मिळून संपूर्ण महाराष्ट्रातून ७० लोकांची जंबो कार्यकारणी तयार करण्यात आली आहे ह्यात राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय अशी पदे देण्यात आली आहे.
ह्या कार्यकारणीत जळगावचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अमोल रावते ह्यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच ही सगळी पदे बिनविरोध निवड करण्यात झाली.
ही निवड व्हिडिओ कॉन्फरन्स मधील मीटिंग मधे करण्यात आली.

डॉ.हिरा पावरा ह्यांचे कार्य व तळमळ समाजासाठी नेहमी लाभदायी असते व त्यांचे पद महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांना सर्वांना न्याय देण्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ह्यावेळी संघटनेतील अनेक समुदाय आरोग्य अधिकारी ह्यांच्या टीमने, अनेक सामजिक संघटनेतील सामजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ह्यांनी डॉ.हिरा पावरा ह्यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button