Pandharpur

बचतगट महिलाचे संपूर्ण कर्ज माफीसाठी केज मध्ये मनसेचा विराट मोर्चा

बचतगट महिलाचे संपूर्ण कर्ज माफीसाठी केज मध्ये मनसेचा विराट मोर्चा

पंढरपूर: रफिक आतार

कोरोनाच्या या महामारीत बचतगट हप्ते भरणे आता अश्यक्य झाले आहे. त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी मनसेने च्या वतीने केज जिल्हा बीड येथे गुरुवार दि 29 रोजी तहसील कार्यालय येथे महिलाचा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये केज शहर आणि परिसरातील सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महिलांनी बचत गट कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून घेतली जात असते. तो विमा हा संकट आल्यावर लागू केला जातो, परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्याचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अश्यक्य झाले आहे. व्यवसाय बुडाले साहित्याची नासाडी झाली यामुळे महिलांना आता नव्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तरी सरकारने यामध्ये योग्य मार्ग काढून अडचणीत आलेल्या महिलांना दिलासा देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देन्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही मनसेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी मागणी सरकारकडे केली

महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी केज चे तहसीलदार यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले हे कर्ज लवकरात लवकर माफ व्हावे महाराष्ट्र नवनिर्माण सेना केज च्याववतीने बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस , प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेना प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे यासाठी प्रचंड गर्दीत महिला मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, तालुका अध्यक्ष कल्याण केदार, केज तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक ,महिला आघाडी, विद्यार्थी सेना, उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button