Patur

सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र झूम मिटींग द्वारे सभेचे आयोजन

सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र झूम मिटींग द्वारे सभेचे आयोजन

विलास डोघडे

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त निमित्ताने सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र संघटनेने झूम मिटींग द्वारे सभेचे आयोजन करण्यात आले होते कोविड 19 मूळे सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने संघटनेने आॅनलाईन मिटींगचे आयोजन केले त्यावेळी संघटनेचे राज्यधक्ष रविंद्रजी आर्य यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळेस आॅनलाईन मिटींगला संघटनेचे सरचिटणीस प्रकाश आर्य कार्यधक्ष सुनिल सूळे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ग्यानसिंग बामणे जळगाव जिल्हा अध्यक्ष चंप्पालाल बरेरा धुळे जिल्हा अध्यक्ष डॉ CM पावरा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मणीलाल नावडे संघटनेचे प्रवक्ते लालचंद भादले महिला प्रतिनिधी सविता पावरा वंदना नावडे तसेच .

समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ग्यानसींग बामणे यांनी जागतिक आदिवासी दिवस का आणि कसा साजरा करवा या विषयी मार्गदर्शन केले मणीलाल नावडे यांनी आदिवासी संस्कृती टिकवणे महत्त्वाचे आहे.

या विषयावर आपले मत व्यक्त केले तसेच संघटनेचे राज्यधक्ष आर्य साहेब यांनी आदिवासी यूवा आणि समाज या विषयावर आपले मनोगत अगदी समर्पक पणे मांडले अनेक मान्यवर यांनी आपले मत व्यक्त करत जागतिक आदिवासी गौरव दिवस ऊतसाहात साजरा करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button