Amarawati

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अमरावती विभागाची शिक्षक सेना पदाधिकारी यांची उमेदवार प्रा श्रीकांत देशपांडे विधान परिषद शिक्षक मतदार संघ विजय संकल्प सभा संपन्न

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अमरावती विभागाची शिक्षक सेना पदाधिकारी यांची उमेदवार प्रा श्रीकांत देशपांडे विधान परिषद शिक्षक मतदार संघ विजय संकल्प सभा संपन्न

प्रतिनिधी – विनोद जाधव अमरावती

अमरावती : महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना अमरावती विभाग पदाधिकारी सभा नुकतीच राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष श्री .ज .मो.अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनात अंजनगाव जि अमरावती येथे विद्यानिकेतन शैक्षणिक संस्थेत संपन्न झाली. शिवसेना घटक पक्ष महाविकास आघाडी चे उमेदवार श्री श्रीकांत देशपांडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडणूक आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला . या विभागातील पदाधिकारी यांनी विजयाचा संकल्प केला याबद्दल गौरवोदगार काढले सभेला उमेदवार प्रा .श्रीकांत देशपांडे अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सुनील खाराटे शिक्षकसेना पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा .नरेंद्र लखाडे तसेच प.विदर्भ प्राथ विभाग अध्यक्ष प्रमोद पवार व सैय्यद राजीक सर यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले व विजयासाठी संकल्प केला यावेळी अमरावती अकोला यवतमाळ वाशीम बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष सचिव जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारीणी प्रामुख्याने उपस्थित होत्या. सभेमध्ये विजयाचा संकल्प करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button