Maharashtra

एच.टी.बी.टी.बियाणे विक्रेत्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश भारतीय किसान संघाच्या निवेदन देतांना ऑन द स्पॅाट कार्यवाही

एच.टी.बी.टी.बियाणे विक्रेत्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश
भारतीय किसान संघाच्या निवेदन देतांना ऑन द स्पॅाट कार्यवाही 

एच.टी.बी.टी.बियाणे विक्रेत्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश भारतीय किसान संघाच्या निवेदन देतांना ऑन द स्पॅाट कार्यवाही

प्रतिनिधी सचिन जयस्वाल
जळगाव – भारतात एच.टी.बी.टी.बियाणे विकून देशाच्या पर्यावरण व शेतक-यांच्या आरोग्याला धोका पोहचविला जात असल्याने या बियाण्याला विरोध करण्यासाठी व त्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे कारवाई तसेच विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने 
धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी अविनाश टाकणे यांना निवेदन सादर केले.
*जिल्हाधिकाऱ्यांची जागृतता*
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर टाकणे यांनी ठाकूर या संबंधित अधिकाऱ्यांना या बियाणे विक्रेत्यांवर जिल्ह्यात कारवाई करण्याचे ‘अॅान द स्पॅाट’आदेश दिले.तसेच जिल्ह्यातून बोदवड येथून तक्रार आली होती.त्याचा निपटारा केल्याचे संबधित अधिकाऱ्यांचे माहितीवरुन सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर,प्रदेश समिती सदस्य कपिला मुठे,उपाध्यक्ष शिवराम महाले,कविता वाणी,श्रीकांत नेवे उपस्थित होते.
याबेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एच.टी.बी.टी.बियाणे बेकायदेशीर आहे.तसेच मानवाच्या जीवनास हानिकारक आहे.त्याच्या वैधतेबद्दल अद्याप चाचण्या झालेल्या नाहीत.केंद्र सरकारने या बियाण्याच्या निर्मिती व विक्रीला प्रतिबंध केला आहे.तरीही गैरमार्गाने हे बियाणे विक्री सुरु असल्याचे दिसते.आरोग्य व पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या एच.टी.बी.टी.बियाणे निर्मितीत गुंतलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी.तसेच ‘ग्लाईफोसेट’ हे किटक नाशक मानवी शरीराला अपायकारक असल्याने त्यावर तातडीने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
या धरणे आंदोलनास लक्ष्मण पाटील (धरणगाव),रवींद्र पाटील, राहुल बारी,(जामनेर),वैभव महाजन,अतुल महाजन,(रावेर) ,अॅड.मधुकर ब-हाटे (चाळीसगाव),अनिल पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, हेमंत वाणी,भगवान न्हायदे, राहुल महाजन,मनोज भाट (चोपडा)  आदी कार्यकर्ते हजर होते.
फोटो कॅप्शन – एच.टी. बी.टी.बियाणे विरोधात जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना निवेदन देताना श्रीकांत नेवे,शिवराम महाले,प्रा.मनोहर बडगुजर, कपिला मुठे,कविता वाणी दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button