Amarawati

?संतापजनक..पोलिसांनी घेतला लॉकडाऊनचा गैरफायदा…शेतकऱ्यांना मारहाण

?संतापजनक..पोलिसांनी घेतला लॉकडाऊनचा गैरफायदा…शेतकऱ्यांना मारहाण

दर्यापूर(जि.अमरावती) : कोरोनासंबंधी लॉकडाऊनचे नियम घोषित झाल्यावर दर्यापूरमध्ये प्रशासन अलर्ट झाले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत आहे. अशातच दर्यापूरमध्ये लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचा चांगलाच प्रसाद मिळाला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दर्यापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
दर्यापूरमध्ये एसटी स्टॅण्ड चौकात दुचाकीवर डिझेल घेण्यासाठी दोन युवा शेतकरी जात असताना ड्युटीवर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शंकास्पद वाटल्याने तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन्ही युवकांना काठीने प्रसाद दिला.
ही घटना बघत असणाऱ्या काही लोकांनी याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे दर्यापूरमध्ये नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात शेतीसंबंधात कामे करण्याची मुभा शासनाने दिली आहे, असे असताना शेतकऱ्यांना झालेली मारहाण दर्यापुरात चर्चेचा विषय ठरली आहे. सदर व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागितला असल्याचे कळते. या प्रकारावर मारहाण करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची
सदर घटना लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांमुळे झाली आहे. याबाबत पोलिसि कर्मचाऱ्यांना बोलावून समज दिली आहे. नागरिकांनी जाहीर झालेले नियम काटेकोरपणे पाळावे, अशी आमची विनंती आहे. पोलिस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.
– प्रमेश आत्राम,
ठाणेदार, दर्यापूर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button