Delhi

महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारे ( पोलीस उप-अधिक्षक) यांची एशियन चॅम्पियनशिप 2020 साठी भारतीय संघातून निवड

महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारे ( पोलीस उप-अधिक्षक) यांची एशियन चॅम्पियनशिप 2020 साठी भारतीय संघातून निवड

प्रतिनिधी दत्ता पारेकर

आज सोमवार दिनांक 13 जानेवारी 2020 रोजी सोनीपत हरियाणा येथे पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप 2020 निवड चाचणी मध्ये महाराष्ट्राचा लाडका मल्ल व सध्या महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उप-अधिक्षक म्हणून प्रशिक्षण घेत असणारा पैलवान राहुल आवारे याने 61 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.

दिल्ली येथे दिनांक 18 ते 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धे साठी आज भारतीय संघाची निवड चाचणी सोनीपत हरियाणा येथे पार पडली.

पैलवान राहुल आवारे यांनी पहिली कुस्ती पैलवान नवीनकुमार दिल्ली याच्यासोबत जिंकत अंतिम कुस्ती पैलवान रविंद्र हरियाणा याच्यासोबत 5-7 गुणांनी जिंकत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.

पैलवान राहुल आवारे यांची राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक व जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याला प्रथम वर्ग दर्जा अधिकारी पदी नियुक्त करत पोलिस उपअधीक्षक पदी थेट नियुक्ती केली.पैलवान राहुल आवारे हा गेली 4 महिने महाराष्ट्र पोलीस दलात “पोलीस उप-अधिक्षक” पदाचे प्रशिक्षण नाशिक येथे घेत असल्याने त्याचा सराव अपुरा होता.मात्र पोलीस अकादमी नाशिकचे संचालक माननीय अश्विनी दोर्जे मॅडम, यासह माननीय श्री सुनील लांजेवार साहेब व माननीय जयश्री देसाई यांनी सरावासाठी सवलत दिली व त्यानंतर राहुल ने आपला गॅप भरून काढत आज भारतीय संघातून एशियन चॅम्पियनशिप साठी आपले स्थान पक्के केले.

पैलवान राहुल आवारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button