Maharashtra

आदिवासी क्रांतीकारक खाज्या नाईक यांच्याबद्धल बातमीत बदनामी करणारे शब्दप्रयोग करणार्या ÀBP माझा धुळेचे रिपोर्टर व ABP माझाचे मुख्य संपादक यांच्यावर अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी

आदिवासी क्रांतीकारक खाज्या नाईक यांच्याबद्धल बातमीत बदनामी करणारे शब्दप्रयोग करणार्या ÀBP माझा धुळेचे रिपोर्टर व ABP माझाचे मुख्य संपादक यांच्यावर अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी

दिलीप आंबवणे

आदिवासी महान क्रांतीकारक खाज्या नाईक यांना “डाकू” म्हणत टिव्ही बातमीद्वारे बदनाम करणार्या “ABP माझा” शिरपूर धुळे रिपोर्टर श्री. संजय सोनवणे व “ABP माझा” न्यूज चॅनेल मुख्य संपादक यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानूसार अॅस्ट्रासिटीचा व सायबर क्रायम अॅक्टनूसार फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी,अशी मागणी बिरसा क्रांती दल संघटनेचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, बिरसा क्रांती दलचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी ,बिरसा क्रांती दलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी, बिरसा क्रांती दलचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रोहित पावरा, ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर पाडवी, बिरसा क्रांती दलचे नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष मनोज पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे दिनेश शेराम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब ,उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित पवार ,गृहमंत्री मा.श्री. अमित देशमुख, आदिवासी विकास मंञी मा.अॅड.के.सी.पाडवी यांच्याकडे दिनांक:17/09/2020 रोजीच्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ABP माझा न्यूज चॅनेलच्या शिरपूर धुळे रिपोर्टरद्वारे शिरपूर जिल्हा धुळे येथील बिजासनी माता मंदीर याविषयी माहिती देतांना “खाज्या नाईक” या डाकूने या मंदीराचे रक्षण केले, असा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे.ABP माझाच्या या बातमीत क्रांतीकारक खाज्या नाईक यांचा “डाकू”म्हणून उल्लेख केल्यामुळे समस्त आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच याबाबत आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे ABP माझा चॅनेलचा आम्ही जाहीर निषेध करतो.

सन 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजाविरूद्ध उठाव करणारा महान योद्धा म्हणजेच क्रांतीवीर खाज्या नाईक.इंग्रांजांच्या अत्याचारापासून गरिब जनतेला वाचवणारा व मदत करणारा महान योद्धा म्हणजेच क्रांतीवीर खाज्या नाईक. 1 एप्रिल 1857 च्या आंबापाणी लढाईचे नेतृत्व क्रांतीवीर खाज्या नाईक यांनी केले होते.त्यावेळेस इंग्रांजाविरोधात लढतांना 1500 भिल्ल आदिवासी सैनिकांनी प्राणांची आहूती दिली आहे. 1860 चा बडवानी( मध्यप्रदेश )येथील इंग्रांजाविरूद्ध उठाव क्रांतीवीर खाज्या नाईक यांनी केला आहे.

अशा स्वातंत्र्य लढ्यातील एका महान योद्ध्याला डाकू म्हणून उल्लेख करत सोशल मिडीयावर ABP बातमीद्वारे बदनाम केले आहे. यामुळे समस्त आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून सदर खोटी बातम्या देणार्या ABP माझा शिरपूर धुळे रिपोर्टर श्री. संजय सोनवणे व बातमी प्रसारित करणार्या ABP माझा चॅनेलच्या मुख्य संपादकावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायद्यानुसार अॅस्ट्रासिटीचा व सायबर क्राईम अॅक्टनूसार फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी. ही विनंती. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.असा इशारा आदिवासी संघटनांतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button