Maharashtra

वाघोद्यात व्हाँटसप ग्रुप तर्फे प्रश्न मंजुषेचा अभिनव उपक्रम…..

वाघोद्यात व्हाँटसप ग्रुप तर्फे प्रश्न मंजुषेचा अभिनव उपक्रम…..
गावात होतेय उपक्रमाचे कौतुक..
प्रथम विजेत्याला मिळते बक्षीस

मुबारक तडवी

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथील आम्ही वाघोदेकर ग्रुप हा नागरीकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.आजची परिस्थिती पहाता एकीकडे सोशल मिडियाचा सर्रास वापर वाढला आहे तर बहुतांश ठिकाणी.व्हाँटसप वर अनेक जण आपला दिवसभर आपला वेळ टाईमपास म्हणुन काढतानांचे चित्र पहावयास मिळते.पण वाघोदा येथील आम्ही वाघोदेकर हा ग्रुप गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.या ग्रुप मार्फत पाच ते सहा दिवसापासून प्रश्न मंजुषेचा अभिनव उपक्रम सुरू आहे. जो प्रथम व बरोबर उत्तर देईल तो विजेता धरला जातो.व त्याला ग्रुप अँडमीन पत्रकार कमलाकर माळी यांच्या तर्फे बक्षीस दिले जाते.या प्रश्न मंजुषे मध्ये फक्त गावातील व गावाच्या संबंधित च प्रश्न विचारलो जातो.या मुळे गावकर्यांना नवीन नवीन माहिती मिळत आहे तर नाँलेज ही मिळत आहेत. हा प्रश्न रात्री 9.20 ते 9.30 या वेळेदरम्यान विचारला जातो.तर या साठी 15 मिनीटे वेळ दिलेला असतो.अर्धातासानंतर विजेत्याचे नाव त्याचे उत्तर ग्रुप वर जाहीर करण्यात येते.व या उपक्रमाला गावातुनच प्रायोजक ही मिळत आहे.अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तो हा ग्रुप 4 वर्षापासून सुरू असुन यावर फक्त गावातील च बातम्या पहावयास मिळतात. छोटे मोठे कार्यक्रम. निधन वार्ता.हरवले. सापडले.अशा अनेक बातम्या यावर टाकल्या जातात.या ग्रुपच्या एकुण सहा शाखा आहेत. त्यात महीलांचा स्पेशल ग्रुप आहे.एकुण 1180 सदस्य असणाऱ्या ग्रुप चे अँडमीन पत्रकार कमलाकर माळी हे आहेत.हे स्वतः चार वर्षांपासून याग्रुपला हाताळत आहे.यामधील भरपूर सदस्य गावातील असुन ते नोकरीला मुंबई.गुजरात. पुणे.नाशिक औंरगाबाद.दिल्ली .दुबई.येथे स्थायिक आहेत. पण त्यांना ही या ग्रुप मार्फत गावातील घडामोडी कळतात.या ग्रूप ने आतापर्यंत गावात नवीन नवीन सामाजिक उपक्रम राबविले आहे. या ग्रुप वर फक्त पोस्ट टाकण्याचा अधिकार हा अँडमीन चा आहे. हा असा एकमेव ग्रुप आहे की ग्रुपला जाँईन होण्याकरिता स्वता नागरिक अँडमीनला भेटतात.गावातील घडामोडींचे सविस्तर माहीती नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम या ग्रुप मार्फत केले जाते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button