Paranda

अमृत महोत्सवी वर्षानिमित नगर परिषद परंडा येथे दिवाणी न्यायालय च्यावतीने विधि साहाय्य शिबिर

अमृत महोत्सवी वर्षानिमित नगर परिषद परंडा येथे दिवाणी न्यायालय च्यावतीने विधि साहाय्य शिबिर

सुरेश बागडे परंडा

परंडा : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित नगर परिषद परंडा येथे दिवाणी न्यायालय परंडा यांच्याकडून विधि साहाय्य शिबिर संपन्न झाले .

नगर परिषद परंडा व विधिसेवा समिती परंडा यांच्या संयुक्त वियमाने राष्ट्रीय उपजीविका अभियानांअंतर्गत विधि साहाय्य शिबिर ( Civil Court, Paranda)आयोजित केले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस .जी . बावकर (Judge S.G. Bavkar) यांचे हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आली. या वेळी न्यायाधीश बावकर (Judge S.G. Bavkar) यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अमृत महोत्सवी केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजनांची माहिती दिली .
तालूका विधिसेवा समिती यांच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांना ज्यांचे उत्पन्न तीन लाखांच्या आत असेल, अशा लोकांना मोफ़त सल्ला व कायद्याविषयी साहाय्य असल्याचे निषिद केले . तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी , ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन स्तरावरून अनेक सेवा योजनाचे धोरण सेवा योजनेचे धोरण निश्चित असून राष्ट्रीय अमृत महोत्सवी वर्षानिमित (On the occasion of Amrit Mahotsavi) प्रभावी अमलबजावणी करण्याचे प्रतिपादन केले . यावेळी न्यायाधीश एस.जी . बावकर यांचे हस्ते स्वच्छ भारत, ७५ वी आजादी महोत्सव ओला , सुका कचरा विलगिकरण या कार्यक्रमाच्या अंतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . तसेच राष्ट्रीय बचत गट , उद्योजक यांना मार्गदर्शन करण्यात आले . या कार्यक्रमास नगरसेवक राहूल बनसोडे वाजीदभाई दख्खणी , महेश कसबे , अधिक्षक शिंदे पी .पी . संतोष दिक्षीत , मुजावर जलाल , अक्षय देवकर , बादीश मुजावर ,नशीर लुकडे आदी कर्मचारी हजर होते . प्रास्ताविक शिंदे तर राहूल बनसोडे यांनी आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button