Nashik

लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्रीस अडचणी बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हिरामण शेवाळे यांनी मिरची पिक उपटून फेकले.

लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्रीस अडचणी बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हिरामण शेवाळे यांनी मिरची पिक उपटून फेकले.

महेश शिरोरे

सध्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला भाव मिळत नसल्याने खामखेडा येथील शेतकरी हिरामण शेवाळे यांनी एक एकर मिरचीसाठी पाऊनलाख खर्च करून सध्या कवडीमोल भावामुळे उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याने शेतातील मिरची उपटून फेकली आहे.
खामखेडा परिसर हिरवी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे.कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आले आहेत.तसेच अनेक ठिकाणी व्यापारी मिळत नसल्याने त्याचा परिणाम या भागातील भाजीपाला शेतातच सडू लागला आहे.
खामखेडा येथील शेतकरी हिरामण नारायण शेवाळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर लागवड करणे ,मशागत,रासायनिक खत,औषधे फवारणी तसेच ड्रीप व मल्चिंग पेपरसाठी असा पाऊनलाख खर्च केला होता.
यावर्षी सर्वत्र पाणी चांगले असल्याने या परीसरासह मिरची अधीक प्रमाणावर लागवड झाली आहे.मात्र, बाजार बंद असल्याने शेतकर्‍यांना सध्या भाव नसल्याने व विक्रीसही अडचणी असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या भागातील मिरची दरवर्षी धुळे,मालेगाव,नंदुरबार,अमळनेर,सुरत,नाशिक या भागात विक्रीसाठी नेत असत.तर अनेक भागातील व्यापारी थेट ह्या भागात येत स्वत खरेदी करत असत.मात्र सध्या भाजीपाला बाहेर विक्रीसाठी घेऊन जाणेही अवघड आहे.मार्केटही बंद असल्याने ये-जा करण्यासाठीचा वाहनाचा खर्च निघणेही कठीण होत असल्याचे त्यातच विक्रीसाठी घेऊन जाणे,तोडण्याचा खर्चही निघत नसल्याने त्यांना पिकांवर केलेला खर्च निघणेही कठीण झाल्याचे दिसून आल्याने त्यांनी आज एक एकर क्षेत्रावरील शेतातील उभ मिरचीचे पिक हतबल होत उपटून फेकले आहे.
मिरचीला सध्या दोन ते तीन रुपये किलो बाजारभाव आहे.मिरची तोडणीसाठी झालेला खर्चही निघणे कठीण झाले असल्याने व त्यातच आता पिक काढून टाकण्यासाठीही खर्च होणार असल्याने शेतकर्‍यांवर लॉकडाऊन दरम्यान मोठे संकट आल्याचे दिसून येत आहे.
सध्या मिरची काढणी सुरु होती.काढनिसाठीचा खर्च देखील सुटत नसल्याने बाहेरचे मार्केट बंद आहे, बाहेर माल घेऊन जाणेही अवघड आहे, त्यातच स्थानिक मार्केट हि नसल्याने आज मिरची उपटून फेकली आहे.लॉकडाऊनचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे.

हिरामण शेवाळे,मिरची उत्पादक खामखेडा

पंचनामे करून भरपाई द्यावी
अनेक शेतकर्‍यांनी भाजीपाला, टरबूज, बीट पीक घेतले आहे. संचारबंदीमुळे भाजीपाला, टरबूज वाया गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.यामुळे शेतकर्‍यांवर वाईट वेळ आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा भाजीपाला,टरबूज यांचे पंचनामे करून शासनाने त्यांना अनुदान द्यावे, यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळेल.
गणेश शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button