Jamner

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते “ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व नर्सिंग होमचा” शुभारंभ

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते “ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व नर्सिंग होमचा” शुभारंभ

जामनेर विनोद जाधव

जामनेर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते “ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व नर्सिंग होमचा” शुभारंभ करण्यात आला. यावेळी जी.एम. डायग्नॉसिस सेंटरचेही व्हर्च्युअल उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मा.ना.श्री.Devendra Fadnavisजी, खा. Unmesh Patil – उन्मेश पाटील, खा. Dr. Subhash Bhamre , खा. Rakshatai khadse, जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, नगराध्यक्ष, जि.प. सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.

यावेळी हॉस्पिटलची माहिती देताना, उपलब्ध सुविधा व विविध संस्थांतर्फे करण्यात येत असलेली मदत याविषयी सविस्तर माहिती दिली.

सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा एकाच ठिकाणी आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध होणार असल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. गरिबांच्या सेवेसाठी अनेक योजना येथे आहेत. रूग्णांना कमी दरात रूग्णसेवा मिळावी, याचा प्रयत्न येथे आवर्जून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांसाठी हक्काचे एक रूग्णालय उपलब्ध होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button