Jamner

जामनेर पो.स्टे मधील दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी महिले कडून २५ लाखाची खंडणी घेताना अटक

जामनेर पो.स्टे मधील दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी महिले कडून २५ लाखाची खंडणी घेताना अटक

जामनेर : जामनेर पो.स्टे मधील दाखल गुन्हयात
जामनेर पोलिस स्टेशन ला दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना २५ लाख रुपयांची खंडणी मागणी करून त्यातील ५० हजार रुपये रक्कम १ लॉजवर स्वीकारतांना महिलेस लासलगाव पोलिसांनी सापळा रचुन अटक केली असुन या प्रकरणात प्रफूल लोढा जामनेर सुनिल कोचर सिल्लोड यांनी मदत केल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जामनेरचे पारस ललवाणी , अल्केश ललवाणी, यांच्या विरोधात श्रीरामपूर येथील ज्योती चंदूलाल कोठारी यांच्या तक्रारी वरून बालविवाह प्रतिबंधक कायदा ,बालकाचे लैंगीक अपराध यापासुन संरक्षण आदी कलमा नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .
या प्रकरणात मदत करण्यासाठी सदरच्या महिलेने २५ लाख रुपयांची खंडणी ची मागणी केल्या गेली .
त्यातील ५० हजार रुपये लासलगाव येथे १ लॉजवर घेतांना श्रीरामपूर येथील महिलेस घेतांना अटक करण्यात आली असुन 2 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button