Bollywood

Bollywood: ओहो…!आता एव्हरग्रिन रेखा दिसणार ह्या टिव्ही मालिकेत..!

Bollywood: ओहो…!आता एव्हरग्रिन रेखा दिसणार ह्या टिव्ही मालिकेत..!
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांचा अभिनय पाहणे चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. मात्र आता त्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये सुद्धा क्वचितच दिसतात. त्यांनी आपले स्क्रिनवरचे कामही कमी केले आहे. त्यामुळेच चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी खूप आसुसलेले असतात. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे रेखा लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत.त्या आता स्टार प्लसची हिट मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये दिसणार आहेत.
स्टार प्लसवरील मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ हा केवळ जुन्या पिढीसाठीच नाही तर तरुण पिढीमध्येही एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो आहे. जबरदस्त ट्विस्टमुळे ही मालिका नेहमीच टीआरपीच्या यादीत अवल्ल राहिली. आता अभिनेत्री रेखा या शोमध्ये खास भूमिका साकारणार आहेत.

रेखा याआधीही या शोमध्ये दिसल्या होत्या
रेखा स्टार प्लसवर तिसर्‍यांदा दिसणार आहे. याआधीही त्या ‘गुम है किसी के प्यार में’सोबत जोडल्या गेल्या होत्या. प्रेक्षकांनी त्यांना टीव्हीवर पाहिले तेव्हा तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. रेखाचा या मालिकेशी नेहमीच खास संबंध राहिला आहे.

रेखा नव्या स्टारकास्टची ओळख करून देणार आहेत

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत मोठे ट्विस्ट आणि रंजक वळण येणार आहेत.रेखा या मालिकेतील नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहेत. त्यामुळे त्या या शोमध्ये स्पेशल अपिअरन्स देणार आहे.

या वेळेत मालिका पाहू शकता

राजेश राम सिंग, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शैका परवीन यांनी या शोची संयुक्त निर्मिती केली आहे. सोमवार ते रविवार रात्री ८ वाजता हा शो स्टारप्लसवर प्रसारित होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button