Jamner

जामनेर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाची समिती जळगावात दाखल !

जामनेर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाची समिती जळगावात दाखल !

जामनेर : जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासन गठीत चौकशी समिती आज जळगावात दाखल झाली आहे. या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा खळबळजनक आरोप ॲड.विजय पाटील यांनी केला होता.
जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाला असून त्यात साधारण दोनशे कोटीचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजय पाटील यांनी राज्य शासनाकडे दिली होती. राज्य शासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत तीन सदस्य चौकशी समिती गठित केली होती. यासंदर्भात नुकताच एक शासन अध्यादेश देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार ॲड. विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज आपण कामानिमित्त बाहेरगावी आहोत. चौकशी समिती जळगावात आल्याचे मलाही कळाले आहे. याबाबत लवकरच आपण चौकशी समितीची भेट घेऊन सर्व कागदपत्र त्यांच्या समोर सादर करणार आहोत. एवढेच नव्हे तर थेट घटनास्थळी म्हणजेच जामनेर येथे जाण्यासाठी मी समितीकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी ‘द क्लियर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समितीने जिल्हा परिषदमध्ये जात आज काही महत्वपूर्ण कागदपत्र ताब्यात घेतल्याचे कळते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button