Champa

कुही पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दुचाकीसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त दारू माफियांवर धडक कारवाई सहा आरोपींना अटक

कुही पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दुचाकीसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

दारू माफियांवर धडक कारवाई सहा आरोपींना अटक

चांपा:अनिल पवार

लॉकडाऊनच्या काळातही मद्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कुही पोलिसांनी कंबर कसली आहे .उमरेड ते नागपूर महामार्गावरील मद्यविक्रीच्या अड्ड्यावर धाडीचे सत्र सुरू केले आहे .व स्थानिक कुही पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या नागपूर उमरेड महामार्गावर पाचगाव पोलिस चौकीच्या समोर संचारबंदीच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कुही पोलिसांनी कठोर पाऊल उचलले त्याच पार्श्वभूमीवर कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी नागपूर उमरेड महामार्गावर पाचगाव पोलिस चौकीसमोर केलेल्या नाकाबंदीच्या कारवाई दरम्यान

उमरेडहून नागपूरकडे जात असणाऱ्या दोन पांढऱ्या रंगाची एक्टिव्हा व एक पशन प्रो दुचाकी क्रमांक MH-40-BS-0696 ,व MH-49-W-1588,व एक्टिव्हा दुचाकी क्रमांक MH-49-AD-0944 अश्या तीन दुचाकी वाहनासह दोन रबरी ट्यूब व प्लास्टीक ड्रममध्ये १४०लिटर मोहफुल हातभट्टी किंमत २८हजार रुपयाचा माल असा एकूण १लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक करण्यात आली .

कारवाई दरम्यान आरोपी गौरव किशोर बिहाडे वय 18वर्ष रा , कुरडकर पेठ , पाचपावली नागपूर , चूडामण रामेश्वर गोडबोले , वय 38वर्ष रा .कुरडकर पेठ , पाचपावली नागपूर , आशीष शैलेश पाटिल , वय 24वर्ष रा . रामकृष्णनगर दिघोरी नागपूर , महेश भाऊराव मगरे वय 21वर्ष रा .रामकृष्णनगर दिघोरी नागपूर ,राजेश अशोक मुन्नरवार वय 34वर्ष रा , रामकृष्णनगर दिघोरी नागपूर , सचिन रमेश हटवार वय, 28वर्ष रा .रामकृष्णनगर दिघोरी नागपूर ,अशी अटक करण्यात आलेल्या वरील सहाही आरोपी विरुध्द मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ई )अ .अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले .

आरोपीच्या ताब्यातून तीन मोटारसायकल व मोहफुलाची गावठी दारू असा एकूण 1लाख 88हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला .ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के स.फौ अशोक काटे ,पो.हवा दिलीप लांजेवार,विजय कुमरे पो.शी पवन सावरकर,पंकज बुटले,दुर्गेश डहाके,अमित पवार यांनी पार पाडली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button