Amalner

जि.प.पिंगळवाडे शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.प्रविण पाटील यांना खान्देश भूषण पुरस्कार जाहीर…

जि.प.पिंगळवाडे शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.प्रविण पाटील यांना खान्देश भूषण पुरस्कार जाहीर…

अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.प्रविण राजधर पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आदिल शाह फारुकी बहुद्देशिय संस्था अडावद ता.चोपडा जि.जळगाव संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे दरवर्षी दिला जाणारा ‘खान्देश भूषण’ हा पुरस्कार सन 2021 साठी श्री.प्रविण पाटील सर यांना जाहीर झाला आहे. श्री.प्रविण पाटील हे आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असतात तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे आपले सामाजिक दायित्व पुर्ण करत असतात. पूज्य सानेगुरुजी युवा मंच मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपल्या सानेनगर-तांबेपुरा परिसरातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, वाचनालय व प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. या त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊनच श्री.प्रविण पाटील सरांना या वर्षीचा ‘खान्देश भूषण पुरस्कार 2021’ जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्काराचे वितरण लवकरच केले जाणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष फारुक शाह नौमानी व उपाध्यक्ष डॉ.जाविद शेख यांनी आपल्या दि.15-10-2021 च्या अभिनंदन पत्राद्वारे कळविले आहे. श्री.प्रविण पाटील सर यांच्या या यशाबद्दल अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.आर.डी.महाजन साहेब, अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी.धनगर साहेब, अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.चंद्रकांत साळुंके, पिंगळवाडे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सोनवणे, उपशिक्षक श्री.रविंद्र पाटील, श्रीम.वंदना सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या या यशाचे अमळनेर तालुक्यातील सर्व अधिकारीवर्ग व शिक्षकवर्गातून सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button