Bollywood

KGF 2 : कन्नड सुपरस्टार चा KGF2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!ट्रेलर डेट रिलीज..

KGF 2 : कन्नड सुपरस्टार चा KGF2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!ट्रेलर डेट रिलीज..

कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट KGF Chapter 2 च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. KGF च्या पहिल्या पार्ट ला चाहत्यांनी डोक्यावर घेतले.ह्याचे संगीत ट्यून ने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.KGF 2च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय. 27 मार्च रोजी संध्याकाळी केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करताना प्रशांत नीलने लिहिले की, ‘वादळापूर्वी नेहमीच गडगडाट होत असतो. KGF chapter 2चा ट्रेलर 27 मार्च रोजी संध्याकाळी 6.40 वाजता प्रदर्शित होणार आहे. यशचा ‘अँग्री यंग मॅन लूक’ पोस्टरमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये यशच्या क्लोज अप फोटोसह ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ देण्यात आली आहे. चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल, असेही सांगण्यात आले आहे.

KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.
फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2 ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथे चित्रपटाचा पहिला भाग संपला होता. KGF 2मध्ये रॉकी त्याच्या आईला दिलेले वचन पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी रॉकी पूर्वीपेक्षा जास्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याची एक जबरदस्त झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळणार आहे. रॉकी ‘KGF 2’मध्ये गरीबांना मदत करताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननही KGF 2मध्ये एंट्री केली आहे. ती यात पंतप्रधानाची भूमिका साकारत आहे. जबरदस्त डायलॉगसह तिच्या व्यक्तिरेखेची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात येणार आहे. यासोबतच श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रवीना टंडनची व्यक्तिरेखा कथेतील एक मोठा दुवा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय दत्त मुख्य खलनायक ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तचा ‘अधीरा’ लूक याआधीच समोर आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button