Jalgaon

? जळगांव LIVE … शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कडे वळावे : मा. संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव

? जळगांव LIVE … शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कडे वळावे : मा. संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव

जळगांव : कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, सानेगुरुजी फाउंडेशन, अमळनेर व कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी वर्गासाठी कार्यशाळा व शेतकऱ्यांना मोफत सेंद्रिय खत, निमार्क ,ट्रायकोडर्मा तसेच शेतकरी वर्गासाठी उपयुक्त असणारे टीकम, पावडा, तगारी व दुधाचे कॅन मोफत वितरण करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. संभाजी ठाकूर हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख समन्वयक डॉ. बाहेती साहेब तसेच डॉ. स्वाती कदम मॅडम त्याचबरोबर डॉ. वैरागर साहेब, श्री किरण जाधव, मंडल कृषी अधिकारी किशोर साळुंखे तसेच साने गुरुजी फाउंडेशन अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील व महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे समन्वयक प्रा. सुनील गरुड हे उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
प्रा. सुनील गरुड यांनी शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती सात राज्यांमध्ये करत असलेल्या विविध कामांचा सामाजिक उपक्रमांचा संस्कृती व शैक्षणिक कार्यक्रमांचा आढावा मांडला त्याच बरोबर श्री विजय नवल पाटील यांनी आज पर्यंत राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला. डॉ.स्वाती कदम मॅडम यांनी गांडूळ खत याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, किशोर साळुंखे यांनी सध्या स्थितीत शासनाच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना याविषयीची विस्तृत माहिती दिली. त्यानंतर उपस्थित शेतकरी वर्गाला सेंद्रिय खत, वनस्पती लागवड, बांबू लागवडीचे महत्त्व व शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे व कशा पद्धतीने शेती कसावी याविषयी संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शासन व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद वतीने शेतकऱ्यांच्या साठी राबवले जाणारे विविध उपक्रम नव्या शेतीचा तंत्रज्ञान शेतकरी अवजारे व त्यांचे उपयोग सेंद्रिय खताच्या सर्वांमध्ये शेतक-यांनी करावयाचे प्रयत्न याविषयी सखोल मार्गदर्शन करून त्याविषयी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेर, व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती या दोघांच्या कामाचा उल्लेख करून हे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे अशा भावना व्यक्त केल्या त्यानंतर डॉ. वैरागर यांनी गट शेती कश्या पद्धतीने करायची, विक्री व्यवस्थापनच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी कशास रूपाने संघटित होऊन शेतीमालाची विक्री करायची याविषयीच्या शासन योजना त्यांनी विस्तृतपणे शेतकऱ्यांना सांगितल्या.
त्यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दुधाची कॅन, टीकम, पावडा, टोपली, निमार्क, ट्रायकोडर्मा व सेंद्रिय खताच्या 150 शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे सारेच कर्मचारी वृद सहभागी होते .ममुराबाद गावचे सरपंच तसेच विकास सोसायटीचे संचालक संचालक यांचे सहकार्य लाभले शेतकऱ्यांनी सर्व मार्गदर्शकांचे मनोगत शांतपणे ऐकून घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दिपक पवार, श्री अनिल पाटील, श्री प्रवीण पाटील, श्री संगेश सूर्वे, श्री जयेश माळी, श्री. अरुण सूर्यवंशी तसेच कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथील कर्मचार्याशनी अविरत परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला ममुराबाद पंचक्रोशीतील जवळपास दोनशे शेतकरी उपस्थित होते या सारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मागे राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे फार मोठे योगदान होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भूषण लाडवंजारी यांनी केले व आभार डॉ. विशाल वैरागर यांनी मानले.

आपले विनीत
प्रा. सुनील गरुड, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती,
श्री. नरेंद्र पाटील, सानेगुरुजी फाउंडेशन, अमळनेर
डॉ. हेमंत बाहेती, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म जळगाव

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button