Kolhapur

कालिदास विद्यापीठाचे संस्कृत केंद्र सुरू.

कालिदास विद्यापीठाचे संस्कृत केंद्र सुरू.

सुभाष भोसले-कोल्हापूर
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर मान्यताप्राप्त रविकीर्ति संस्कृत अध्ययन केंद्राचा प्रारंभ उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबादचे निवृत्त संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रमोद लाळे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना त्यांनी संस्कृतभाषा ही आपल्या देशाची भाषिक शक्ती असून आदर्श नागरिक घडविण्याची, संविधानिक मूल्ये बालपणापासूनच रुजवण्यासाठी संस्कृतचे अध्ययन प्राथमिकपासून सर्वच स्तरातून होणे आवश्यक आहे.संस्कृत ही आपली राष्ट्रभाषा व्हावी, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे मत व्यक्त केले.यासाठी कालिदास विद्यापीठ मोठ्या प्रमाणात कार्य करत असून आपल्या येथे या केंद्राचा प्रारंभ होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त करून सर्वांनी या संस्कृत अध्ययन पदविकेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी डॉ.सौ.व श्री.विवेक शिराळकर(खणभाग)यांची उपस्थिती लाभली.दहावी उत्तीर्ण, वय वर्ष सोळा पूर्ण कोणीही या सहा महिन्याच्या कालावधी पदविकेला प्रवेशपात्र असून प्राथमिक स्तरापासून संस्कृत अध्ययन करता येणार असून अंतिम मुदत १५नोव्हेंबर२०१९ आहे. अधिकाधिक लोकांनी १०४,संस्कृती सहनिवास, सिटी हायस्कूल मागे, गांवभाग, सांगली येथे संपर्क करण्याचे आवाहन संस्कृत शिक्षक तथा संचालक रघुवीर रामदासी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button