Amalner

सहयोग फाउंडेशन अमळनेर तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

सहयोग फाउंडेशन अमळनेर तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

अमळनेर

अमळनेर : सध्या कोरोना सारख्या भीषण परिस्थिती राज्यात रक्ताचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ता अभावी अनेक रुग्ण व रुग्णाचे नातेवाईकांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने, ह्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन
दि.६-१-२०२१ रोजी *सहयोग फाउंडेशन अमळनेर* तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते सकाळी ९ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. नागरिकांनी सहयोग फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले तसेच रक्तदान शिबिरा साठी जळगाव येथिल गोळवलकर रक्तपेढीने सहकार्य केले.शिबिरानंतर सर्व रक्तदात्याना सन्मानपत्र देऊन समारोप करण्यात आला.शिबिरासाठी सहयोग फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button