kalamb

कळंब:-तालुक्यात प्रथमच L.E.D बल्ब चा कारखान्याची बुधवारी होणार सुरुवात

कळंब:-तालुक्यात प्रथमच L.E.D बल्ब चा कारखान्याची बुधवारी होणार सुरुवात

नागरिकांना अल्प दरात मिळणार सर्व वस्तु, महिलांची उत्सुकता शिगेला

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब:-याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब तालुक्यात प्रथमच शिंदे इंडस्ट्रीज च्या वतीने कळंब येथे L.E.D बल्ब चा कारखान्याचे उद्घाटन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे..

या कंपनीमध्ये एलईडी बल्ब,स्ट्रीट लाईट,स्क्रबर,वायफर,मॉप,नायलॉनचे झाडू,चार्जिंग चे बल्ब आदी घरगुती किंवा औद्योगिक कामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी होलसेल दरामध्ये मिळणार आहेत तसेच नवोद्योजकांना डीलरशिप देऊन योग्य ते सहकार्य करणार असल्याचे महादेव शिंदे यांनी सांगितले आहे..

एलईडी बल्ब टिकाऊ असतो आणि बराच काळ टिकतो. प्लास्टिक असल्याने ते तुटण्याची भीती नाही.

जेव्हा इलेक्ट्रॉन अर्धसंवाहक सामग्रीमधून जातात तेव्हा ते LEDs नावाच्या लहान कणांना प्रकाश देतात. हे सर्वात जास्त प्रकाश देते.

तसेच LED बल्बचे आयुष्य साधारणपणे 50000 तास किंवा त्याहून अधिक असते, तर CFL बल्बचे आयुष्य फक्त 8000 तासांपर्यंत असते.

असे शिंदे इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे महादेव शिंदे यांनी सांगितले आहे.तरी कळंब तालुका व परिसरातील नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी शिंदे यांनी केले आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button