Boliwood

Jay Bhim: अभिमानास्पद: अजून एक विक्रम..!ऑस्करच्या अधिकृत  you tube चॅनल वर आता जय भीम…

Jay Bhim: अभिमानास्पद: ऑस्करच्या अधिकृत you tube चॅनल वर आता जय भीम…

प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल असं काम एका भारतीय सिनेमानं केलंय. दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याच्या जय भीम चित्रपटाचं भारतात नव्हेच तर जगभर कौतुक झालं. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने अनेक विक्रम मोडित काढले. आता या चित्रपटानं आणखी एक नवा रेकॉर्ड केला आहे. जय भीम हा चित्रपट ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर झळकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
काही दिवसांपूर्वी IMDb ने 2021 मधील लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये जय भीम या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकवला होता. तामिळनाडूमधील सत्य घटनेवर आधारित चित्रपट जय भिम अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात आला होता. साऊथचा सुपरस्टार सुर्या सिवकुमारची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट तमिल, तेलुगु, हिंदी, कन्नड़ आणि मलयालम या पाच भाषांमध्ये प्रदर्शीत झाला. तमिळनाडूमध्ये ९० च्या दशकात झालेल्या दलितांवरील अत्याचाराबाबत हा चित्रपट आहे. यात सुर्या वकिलाच्या भुमिकेत असून चित्रपटाचा बहुतांश भाग कोर्टरुम ड्रामावर आधारित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button