Amalner

खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन..

खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन..

अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना, एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, बांभोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वी ते १२ वीच्या
विद्यार्थ्यांसाठी १६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “मोफत रंगभरण स्पर्धा” आयोजित केली आहे. शहरातील एम.जे.हॉल येथे
ही स्पर्धा होईल. उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत
ही स्पर्धा होईल. विजेत्या स्पर्धकांना प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे दिली
जातील,विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे क्लासेस संघटनेचे अध्यक्ष व स्पर्धा प्रमुख भय्यासाहेब मगर यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Back to top button