Chopda

Jalgaon Live: अरे बापरे … दुचाकी चालवीत असताना आला हार्ट अटॅक..

Jalgaon Live: अरे बापरे … दुचाकी चालवीत असताना आला हार्ट अटॅक..
आपली पत्नी व मुलासह दुचाकीवरून जात असलेल्या पतीला अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर नियंत्रण सुटून दुचाकी थेट पाटचारीत कोसळली. यावेळी दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील टेंभी गावाजवळ घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील पत्नी व मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. राजु बशीर पिंजारी ( वय ५५ वर्ष, रा. फुलेनगर, चोपडा ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
चोपडा येथील फकीर वाडा फुलेनगर येथे राहणारे राजु बशीर पिंजारी हे पत्नी रुक्साना व मुलगा मुक्तार यांच्यासोबत दुचाकीवरुन भुसावळ येथील नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून भुसावळकडून यावलमार्गे चोपड्याकडे परतत असताना टेंभी गावानजीक अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व घाम आला.

त्रास जाणवायला लागल्याने त्यांनी त्यांच्या मागे बसलेली पत्नी व मुलगा यांना सांगितले. त्रास वाढल्याने ब्रेक मारून दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. यात दुचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीसह रस्त्यालगत असलेल्या हतनूर धरणाच्या पाटचारीत कोसळले. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार राजू पिंजारी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी झाले.

या ठिकाणी जात असलेले जितेंद्र सोनवणे यांच्यासह अन्य ग्रामस्थ नागरिकांनी तातडीने रूग्णवाहिका घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून तिघांना ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच राजू पिंजारी यांचा मृत्यू झाला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button