चिमूर,चंद्रपूर

फटाके फोडण्या ऐवजी कपडे देऊन साजरी केली प्रदुषण मुक्त दिपावली

फटाके फोडण्या ऐवजी कपडे देऊन साजरी केली प्रदुषण मुक्त दिपावली

पर्यावरण संवर्धन समीती चा पर्यावरण पुरक उपक्रम

चिमुर—ज्ञानेश्वर जुमनाके

– चिमुर तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. धो-धो पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले. चिमुर तालुक्यातील नेरी वरुन ३ किलोमीटर वर असलेल्या सावरगावात बिसन धारने ह्याचे घर पावसाने जमिन दोस्त झाले. संसार उघड्यावर पडला. संसाराची चाके मोडली. उन, वारा, पावसापासून रक्षण व्हावे यासाठी दोघेही वृध्द दाम्पत्य एका मंदिरात आसरा घेत आहेत. कठे रहावे? कुठे जावे? हाच प्रश्न निर्माण झाला. डोक्यावरचे छत्र कोसळले. दांपत्यांनी दु:खातुन अश्रु ची वाट मोकळी करुन घेतली.
हि बाब पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या लक्षात येताच घरी दिवाळी ला दरवर्षी प्रमाने फटाके न फोडता त्याच पैशातून कपडे, साडी, चोळी देऊन पर्यावरण पुरक दिपावली वृध्द दाम्पत्यासोबत साजरी केली. पर्यावरणाचे प्रदुषण न करता त्याच पैशातून कपड्यांची भेटवस्तू देण्यात आली. फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदुषणात वाढ होत आहे. पर्यावरणाचे प्रदुषण वाढत आहे. लोकांना श्वसनाचे आजार होत आहे. फटाके फोडण्या ऐवजी गरिब दाम्पत्यांना मदत करुन पर्यावरण संवर्धन समीती ने पर्यावरण पुरक दिपावली साजरी करण्यात आली
यावेळी पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडू लोहकरे, चिखलापारचे सरपंच संतोष डांगे,पर्यावरण संवर्धन समीती सदस्य केशव कुंमरे, विजय मसराम, देविदास श्रीरामे, भुषन कुमरे आदी उपस्थित होते.

कवडू लोहकरे यांचे मत
“” फटाक्यांमुळे पर्यावरणाचे प्रदुषण होऊन मोठे नुकसान होत आहे. जनतेनी फटाके न फोडता उपयोगी वस्तू घ्याव्या. आर्थिक नुकसान टाळावे. पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा. “””

कवडू लोहकरे
अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समीती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button