Kolhapur

“ऊर्जा मैत्रीची, हाक साेबतीची” ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम…

“ऊर्जा मैत्रीची, हाक साेबतीची” ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम…
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : दिवसेंदिवस काेराेनाचा विळखा जास्तच घट्ट हाेत असताना, शाहूंच्या विचारांची पंढरी असणाऱ्या काेल्हापुरात मात्र सामाजिक जाणीवेचं एक आदर्श समाजापुढं सरसावताना दिसून येताेय. काेराेनाच्या महामारीमुळे आराेग्यव्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण झालेला आहे. केवळ अपुऱ्या आराेग्यविषयक संसाधनांमुळे लाेकांचा जीव जात आहे, ही चिंतेची बाब आहे. या अशा परिस्थितित काेल्हापुरमधील आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागताे या सामाजिक भावनेन प्रेरित झालेला शिवाजी विद्यापीठातील मित्रपरिवार “ऊर्जा मैत्रीची, हाक साेबतीची” या व्हॉट्स-अप ग्रुपच्या माध्यमातून कार्यरत आहे.
सध्या काेराेना रुग्णांसाठी वेळेवर बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, प्लाझ्मा या अत्यावश्यक बाबींची वेळेवर पुर्तता हाेत नसल्याने रूग्णासह नातेवाईकांची गैरसाेय माेठ्या प्रमाणात हाेत आहे. ग्रुपच्या माध्यमातून पेशंटचे नाव व त्याला कशाची गरज आहे ही माहीती ग्रुपवर शेअर केल्यानंतर ग्रुपमधील सदस्य आपापल्या परीने चाैकशी करून लवकरात लवकर रूग्णाला साेयी मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असतात. काेणताही रूग्ण आपल्या कुटूंबातील सदस्य असल्याप्रमाणेच सर्वजण त्यासाठी फक्त आराेग्यविषयक साोयसुविधांचाच पाठपुरवठा करत नाहीत तर त्याच्या राहण्याची व जेवणाची गैरसाेय असेल तर आपुलकीने त्याचीही उपलब्धता केली जाते. खऱ्या अर्थाने काेराेनाची साखळी ताेडायची असेल तर माणुसकीची साखळी तितक्याच तीव्रतेने जाेडावी लागेल. ग्रुपमध्ये सुशिक्षित, समविचारी लाेकांचा समावेश आहे. यातील बहुतांश लाेग शासकीय सेवेत रूजू आहेत- आरोग्य, मंत्रालय, पोलिस, महावितरण, पत्रकार ई. सर्व क्षेत्रातील समविचारी युवक असल्याने मदत सुद्धा तात्काळ भेटते. ग्रुपमधील दत्तात्रय कदम, जयवंत भाेसले, सचिन लाेंढे, निवास पाटिल, जयवंत भाेसले , काशीनाथ शेळके, राजेश सातपुते, विशाल पाटिल, निवास पाटिल, प्रदिप तानुगडे, मतिन शेख, निखिल झाेरे, धनंजय बच्चे, अनंत गिरीगाेसावी, रणजित चाैगले, शैलेश चंदुरकर, अनिल पाटिल, पंकज पाटिल, निलेश झाेरे, अमाेल कांबळे, तुषार वारके इ. सदस्य सदैव कार्यरत असतात.
व्हॉट्स ग्रुपचे प्रमुख सुनिल दळवी यांना या संकल्पनेविषयी विचारल्यास त्यांनी “मित्रांनो हे कोरोनामहामारीच संकट निघून जाईल, पण ताेपर्यंत आपण धीर धरला पाहिजे व इतरांना धीरदेखील दिला पाहीजे
माणूस वाचला पाहिजे, माणूस जगला पाहिजे यासाठीच त्याला रक्त, प्लाझ्मा, व्हेंटिलेटर,ऑक्सिजन, जेवणाची व्यवस्था,राहण्याची व्यवस्था,सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवून देत आहोत, आजपर्यंत शेकडो जणांना बेडची उपलब्धता ग्रुपच्या माध्यमातून करून दिली आहे एका सामाजिक भावनेने आणि उत्तर दायित्वाने निर्माण झालेला ऊर्जा मैत्रीची, साथ सोबतीची हा ग्रुप कोरोना काळात केलेल्या या सहकार्यामुळे माणुसकीची उंची मात्र टिकवून ठेवेल.
असे मत त्यांनी विशद केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button