Maharashtra

कुही पोलिसांनी पकडली मोहफुलाची दारू तीन दुचाकीसह चार आरोपींना अटक ;1लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त .

कुही पोलिसांनी पकडली मोहफुलाची दारू
तीन दुचाकीसह चार आरोपींना अटक ;1लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त .

प्रतिनिधी अमोल पवार

चांपा:लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात मोहफुलाच्या दारू हात भट्यात वाढ झाली , शहरातून मोहफुलाच्या दारूच्या वाढत्या मागणीने दारू विक्रेत्यांचे सुगीचे दिवस आले, ग्रामीण भागातील गावागावात सुरु केलेल्या मोहाच्या हात भट्टित मोठी वाढ झाली आहे .यांमुळे संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करीत विनाकारण दारू घेण्यास नागपूर वरून मोठय़ाप्रमाणात ग्रामीण भागात अवाजवी सुरू आहे .नागपुर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे वाटचाल करीत आहे .त्यातच दारुड्यांच्या वाढत्या मोहफुलाच्या मागणीमुळे लॉकडाऊन संचारबंदी नियम धाब्यावर बसवले असून अनेक दारूडे मोहफुलाच्या दारूसाठी शहरातून ग्रामीण भागात ये जा करीत असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

त्याच पार्श्वभूमीवर कुही पोलिसांनी मोहफुलाच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यां चार आरोपीना कुही पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली .त्यांच्या ताब्यातून वाहनासह 1लाख 65हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .ही कारवाई कुही पोलिस स्टेशनअंतर्गत पाचगाव पोलिस चोकीच्या समोर उपविभागीय पोलिस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्या आदेशानुसार कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी केली .

नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत फिर्यादी पोलिस शिपाई अमित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील मदन पटले .वय 20वर्ष , तेजस दिगंबर शेंडे वय 22वर्ष हे दोन्ही रा .शांतीनगर , नागपूर , राजेश जगणराव इंगोले वय 34वर्ष.रा . मणिपूरा नागपूर , अमित अशोकराव लेंढे .वय 24वर्ष , रा .गंगाभाई घाट नागपूर अशी आरोपीची नावे आहेत .

उमरेड नागपूरमार्गे पाचगाव पोलिस चौकीसमोर नाकाबंदी दरम्यान तीन दुचाकी येताना दिसल्या कारवाई दरम्यान तिन्ही दुचाकी थांबवून तपासून केली असता एक्टिव्हा दुचाकी क्रमांक एम एच 31ए एच 3181,एम एच 49एम 6116 व फशन प्रो एम एच 49ए 7907 अश्या तिन्ही दुचाकीत एक काळ्या रंगाची छोट्या प्लास्टिक ड्रममधे , प्लास्टिक पन्नी त मोहफुलाची गावठी दारू वाहनासह एकूण किंमत 1लाख 65हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .कारवाई दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के , पोलिस स.फो.नि विजय कुमरे संजय कानडे , अरुण कावळे , गिरी राठोड , पोलिस शिपाई अमित पवार , पंकज बूटले , दुर्गेश डहाके. आदींच्या उपस्थीत ही कारवाई करण्यात आली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button