Indapur

ऑनलाईन शिक्षणाचे इंदापूर पॅटर्नची राबणार अंकिता पाटील

ऑनलाईन शिक्षणाचे इंदापूर पॅटर्नची राबणार अंकिता पाटील

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेची योग्य अंमलबजावणी व्हावी, असे मत एस. बी.पाटील शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.
एस.बी.पाटील शिक्षण संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण परिषदेत त्या बोलत होत्या. वनगळी येथील शहाजी पाटील विकास प्रतिष्ठान, इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
अंकिता पाटील म्हणाल्या , सध्याच्या परिस्थितीत शासनाचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचेल यासाठी कार्यक्षमतेने प्रयत्न करावे लागतील. त्या करिता इंदापूर तालुक्याचा शिक्षणाचा ‘इंदापूर पॅटर्न’ प्रभावीपणे राबवावा लागेल, असे त्या म्हणाल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, डॉ. संजय चाकणे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर या वेळी मार्गदर्शन केले.अनेक मान्यवरांनी ऑनलाइन शैक्षणिक विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
एस.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण नेमाडे,भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज,श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले, शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक चंद्रकांत कोकाटे, इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे या परिषदेस उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button