Pandharpur

लसीकरणाबरोबरच कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना

लसीकरणाबरोबरच कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा
प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर : ( दि.12) – तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा प्रतिबंधासाठी तसेच रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लसीकरणाबरोबरच कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, पंचायत समितीचे सदस्य प्रशांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत प्रांताधिकारी श्री. गुरव म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरसाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील बेडची संख्या निश्चित करावी. तसेच त्यातील सुविधांचे नियोजन करावे. औषधांचासाठा, ऑक्सिजनसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. गृहविलगिकरणासाठी आवश्यक उपचार सुविधा व कर्मचारी यांची उपलब्धता ठेवावी. ग्रामस्तरीय समिती व वार्डस्तरीय समिती कार्यरत ठेवावी. लसिकरण व चाचण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करावी. शासकीय कार्यालयात कामाव्यतिरिक्त इतर नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांना यावेळी दिल्या.
शासकीय व खाजगी रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल मधील बेड, ऑक्सिजनसाठा, औषधांचा पुरवठा, आय.सी.यु कक्षाची व्यवस्था, आदी बाबत योग्य नियोजन करावे तसेच 65 एकर येथील कोविड केअर सेंटर आवश्यक सुविधा व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपलब्धता करुन सुरु करावे अशा सूचना आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिल्या.उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराबरोबरच इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने. रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधसाठा, ऑक्सिजन पुरवठा, बेड, तसेच स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी दिल्या.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता तसेच वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने निमावली जाहिर केली. नागरिकांनी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे, तसेच कोणत्याही नियमांचा भंग करु अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.
यावेळी बैठकीत आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button