sawada

सावदा येथील अँग्लो उर्दू हायस्कुल मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांचे झाले सत्कार..

सावदा येथील अँग्लो उर्दू हायस्कुल मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांचे झाले सत्कार..

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथीलह कारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कुल या शाळेतील २ शिक्षकांना नुकतेच उर्दू आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले म्हणून इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी चे संचालक मंडळातर्फे,पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी ,अध्यक्षस्थानी अल हाज अकबर खान व मान्यवर उपस्थित होते

,इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल शाळेचे शिक्षक अली हैदर खान अजमल खान व शेखसईद शेख ताहेर या दोन शिक्षकांना दिनांक १४ फेब्रुवारी रोजी, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत

म्हणून या दोन्ही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी अँगलो शाळेत इतिहाद एज्युकेशन सोसायटी चे संचालकांनी घेतलेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यावल चे डॉक्टर जाकिर हुसेन हायस्कूल व जुनियर कॉलेज चे माजी प्राचार्य अब्दुल रउफ सर यांच्या उपस्थितीत संस्थाध्यक्,अल्हाज अकबर खान ,व्हाईस चेअरमन अक्रम खान संचालक शेख हनीफ सर यांनी हार व शाल देऊन शिक्षकांचे सत्कार केले.मात्र शिक्षक अली हैदर खान काही कामानिमित्त बाहेर गेल्याने कार्यक्रमात उपस्थित राहु शकले नाही

नंतर या कार्यक्रमात शाळेतील कला शिक्षक अल्हाज शेख कुतबूद्दिन सर यांची संस्थेने शाळा विकास समिती अध्यक्ष म्हणून निवड केली आणि हार व शाल देऊन,त्यावेळी त्यांचा सत्कार करून अभिनंदनही करण्यात आले

अध्यक्ष अकबर खान दादा ,यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेचा विकास व अधिक दर्जेदार शिक्षण करिता सर्वांच्या मदतीने ,शाळेच्या पुढे पुढील कार्ड कारभार कसा चालवता येईल चालूयासाठी प्रयत्न करणार असे सांगितले यानंतर ,शाळा व शिक्षणासाठी सध्याचे माहिती व तंत्रज्ञानाचे काळात विद्यार्थ्यांच्या हिताकरिता मी सुद्धा कोणत्याही वेळी मदत करण्यास तयार आहेत असे अनमोल मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमात शाळेचे मुख्यध्यापक दानिश सर , इरफान सर, सलीम अहमद सर, जहांगीर सर, जुबेर सर, युनुस सर, शेख सद्दाम सर,असगर खान दादा, सलीम खान, शेख सईद रफिक उपस्थित होते ,सर्व शाळा संबंधितांनी शाळेच्या उन्नतीकरिता संकल्प सुद्धा घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शाळा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन अजमल सर यांनी केले तर आभार शेख सलीम सर यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button