Ahamdanagar

भेंडे येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ओम नागेबाबा अँग्रो इंडस्ट्रीज आणि फर्निचर माँलचा शुभारंभ थाटात संपन्न !

भेंडे येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ओम नागेबाबा अँग्रो इंडस्ट्रीज आणि फर्निचर माँलचा शुभारंभ थाटात संपन्न !

अहमदनगर प्रतिनिधी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडे येथिल ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ओम नागेबाबा अँग्रो इंडस्ट्रीज आणि नागेबाबा फर्निचर माँलचा शुभारंभ ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे चेरमन व माजी आमदार नरेंद्र पाटील घुले,देवगड संस्थानचे महंत भास्करगीरी महाराज, हांडीनिमगावचे महंत सुनिल गीरी महाराज,ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुडके, माजी आमदार पांडुरंगजी अभंग,संपूर्ण महाराष्ट्रात शाखा असलेल्या नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक कडूभाउ काळे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.या कंपनीने शेतीसाठी लागणारी सर्व प्रकारची औजारे आणि नववधूला विवाहात देण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे संसार उपयोगी साहित्य ,फर्निचर, भांडी ही या दालनात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साठी प्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब नजन व बाबासाहेब नजन यांनी हे दालन सर्व सामांन्य जनतेची गरज ओळखून खुले करून दिले आहे.सहकार महर्षि स्व.मारुतराव घुले पाटील यांनी पंचवीस वर्षापूर्वी सामांन्य लोकांच्या छपरावरील उसाचे पाचरट राहू नये तेथे पक्के घर झाले पाहिजे ही ईच्छा तत्कालीन परिस्थितीत व्यक्त केली होती.ती इच्छा नजन बंधूंनी साक्षात साकार केली असे उदगार महंत भास्कर गीरी महाराज यांनी काढले.याप्रसंगी या माँलचे संचालक अशोक मिसाळ, मारुती नजन,काशिनाथ नवले,सुदामशेट तागड,तुकाराम मिसाळ, बापुसाहेब तागड,शिपनकर पैलवान,वैभव खलाटे,दातीर मामा,पोलीस उप अधिक्षक, उपजिल्हाधिकारी,सामाजिक, राजकीय, धार्मिक,उद्योजक, आणि इंडस्ट्रीज क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button