Election Live 2024: कोण होणार महायुतीचा मुख्यमंत्री?
भाजपा -१३२ आमदार
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ आमदार
इतर ९
एकूण २३९
२८८ मतदारसंघांपैकी २३९ जागांवर महायुती विजयी ठरली आहे. यानंतर महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. तसंच कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही असंही ठरलं आहे.
काय शक्यता असतील?
१) भाजपा महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे भाजपाकडे मुख्यमंत्री हे पद जाऊ शकतं. तसं झाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.
२) एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, भाजपा विरोधात असताना त्यांच्याकडे जाणं आणि भाजपाला सरकारमध्ये आणणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.
३) एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता असू शकते. कारण अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक मुंबईसह अनेक ठिकाणी लागले आहेत.
४) देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी आणखी एक शक्यता असू शकते.
या चार शक्यता तूर्तास तरी समोर आहेत. मात्र भाजपा काय निर्णय घेणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.






