Bharat

राजकारणात काहीही होऊ शकते. पुढील राष्ट्रपती शरद पवार???

राजकारणात काहीही होऊ शकते. पुढील राष्ट्रपती शरद पवार???

राजकीय चर्चेला उत…

जयश्री साळुंके

राजकारण ही सर्वात अनिश्चित आणि अविश्वसनीय गोष्ट आहे. यात कोणाचे भाग्य केंव्हा उजळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिगग्ज राजकारणी आणि नेते केवळ भाग्याच्या जोरावर मोठं मोठी पदे भूषविली.राष्ट्रीय पातळीवर देखील अशी अनेक उदा डोळ्यासमोर आहेत.

सध्या इतर राजकीय चर्चे बरोबर शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहे.महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाच्या अनुभवाचा विचार केल्यास शरद पवार च योग्य व्यक्ती या पदासाठी वाटत आहेत.

राजकारणात केंव्हा काय घडेल ते सांगता येत नाही.प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होतील असे त्यांना स्वतःलाही वाटले नव्हते. आताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नावही अनेक लोकांना माहिती नव्हते पण काय घडले ते आपण पाहिले आहे. राष्ट्रपती निवडणुकीला दोन-अडीच वर्ष बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

महाआघाडीच्या चाणक्य शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी पवारांसाठी फिल्डिंग लावणे सुरु केल्याची बातमी पसरल्याने चर्चा रंगली आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेत पाच आणि राज्यसभेत चार खासदार आहेत. त्यामुळे संख्याबळ पाहिले तर शक्य नाही. पण पवारांनी मनात आणले तर काहीही शक्य आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत दोन काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे कुणाला वाटले होते. पण पवारांनी ती जादू केली. वयाच्या ८० व्या वर्षातही पवारांचा फिटनेस तरुणांना लाजवणारा आहे. सर्व पक्षांमध्ये पवारांचे चांगले संबंध आहेत.

काँग्रेसमध्ये असताना पवारांनी थेट पंतप्रधानपदापर्यंत धडक मारली होती. पण त्यावेळी ते शक्य झाले नाही. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत एकूण च पवारांचा परफॉर्मन्स पाहता दिल्लीत त्यांचा दबदबा वाढला आहे. समविचारी पक्ष पवारांची उमेदवारी उचलून धरू शकतात.

भाजपला रोखण्याच्या नावावर विरोधी पक्ष एकत्र आले तर पवार सशक्त उमेदवार ठरू शकतात. भाजपचीही आता २०१४ सारखी ताकद राहिलेली नाही.या वर्षी भाजपा च्या अनेक चुकीच्या निर्णयांची झळ पक्षाला सोसावी लागली आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपची देशाच्या ७१ टक्के भागावर सत्ता होती. आज ती निम्म्यावर आली आहे. अनेक राज्यात भाजपने सत्ता गमावली आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांना गुरुस्थानी मानतात. त्यामुळे मोदी- शहा जोडी काय भूमिका घेते त्यावरही पुढची दिशा ठरणार आहे.

Leave a Reply

Back to top button