Bharat

स्त्रियांना आरोपांच्या पिंजऱ्यात पाहणाऱ्या पुरूष प्रधान समाजातील पुरुषांचे चारीत्र्य १००% साफ असते का … दादासाहेब साळुंखे

स्त्रियांना आरोपांच्या पिंजऱ्यात पाहणाऱ्या पुरूष प्रधान समाजातील पुरुषांचे चारीत्र्य १००% साफ असते का … दादासाहेब साळुंखे

सदर लेख हा आम्ही खुपच विचारात्मक व कायदेशीर रित्या परीपुर्ण पद्धतीनेच लिहीला आहे . त्यामुळे कोणीही जर ह्या पोस्टवर अश्लीलतेचा आरोप करून राजकारण करत असेल तर त्यांनी पहीले जागतीक स्त्रीत्वाचा कायदा अभ्यासावा …

अरे तुझ्या आईला … तेरे माँ की …

हे असले शब्द प्रत्येकाच्या तोंडुन अगदी सहज सतत ऐकायला मिळतात …

एवढंच नाही तर माँदरचोद , भेंदचोद , आईघाल्या व अश्या कित्येक प्रकारच्या ” स्त्री ” व्यक्तीमत्वाला नागडं करणाऱ्या शिव्या आपन रोज जागोजागी पाहुन ऐकतो सुद्धा. ..

पण याच जागेवर आपण फादरचोद , भाईचोद , बापघाल्या अश्या शिव्या का नाही वापरत हा प्रश्न मला नेहमीच पडतो ? विचार तर करा आईने एवढ्या वेदना सहन करून तुम्हाला जिथुन जन्म दिलाय त्याच अवयवावर शिव्या देने शोभते का पुरूष मंडळींना …?

घरात कुणी लहान मुलगा रडत असला कि काय मुलीं सारखा रडतो हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात ऐकायला मिळते हो ? पण आम्ही म्हणतो का नाही रडावं पुरूषांनी ? पुरूष म्हणजे अगदी शुर वीर पराक्रमी आणि स्त्री म्हणजे काही तरी तुच्छ का ..?

मी तर म्हणतो रडावं पुरूषांनी तेही अगदी वाटेल तेवढं आणि वाटेल तसं त्यांनाही मन आहे , विचार आहेत , शरीर आहे आणि त्यांनाही रडुन मन मोकळ करायचा कायदेशीर अधिकार आहे …

एखाद्याला कमी लेखायचे असेल तर म्हंटले जाते बांगड्या भर . का हो ? बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया कर्तृत्वान नसतातच का ? उलट आज त्याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात स्ट्रॉंग समजल्या जाणाऱ्या पुरुषांच्या पेक्षा जास्त मोठी झेप घेतली आहे . आणि अजून घेतही आहेत पण तरीही बांगड्या घालतात म्हणून स्त्री इतकी कमजोर ठरते का …?

आपल्यात नपुंसक लोकांची फार खिल्ली उडवल्या जाते . कधी कधी तर एखाद्या मुलाने काही केल्यास काय छक्क्या / हिजड्या सारखं करतोय असे देखील ऐकायला मिळत . पण नपुंसक म्हणजे अर्धा पुरूष आणि अर्धी स्त्री पण तरीही त्याला स्त्री वरूनच शिव्या द्यायच्या . म्हणजे आलंच परत स्त्री वर . खरं तर ते ही आपल्या सारखी माणसं आहेत . लागल्यावर त्यांना ही दुखतं .त्यांच ही रक्त लालच असंत . मागासवर्गीयांचा ही कधी असाच विटाळ होत होता . म्हणुन या मध्ये त्यांची काही चुक नसुन त्यांच्या तिल क्रोमोझोम्संची असतात …

स्त्री ही सृष्टी ची निर्माती आहे तरी प्रत्येक गोष्टीत तिलाच दोष दिला जातो ?

तिने कसे कपडे घालावे ? पंजाबी ड्रेस घालावा कि ? जिन्स कि शॉर्टस् ? हे सुद्धा तिला स्वतःच्या मनाने घालण्याचा अधीकार नाही आणि तिचं कैरेक्टर हे तिच्या कपड्यांवरून ठरवल जातं आणि हे ठरवणारे तिचं आई – बहिनीवर शिव्या देणारी पुरूष मंडळी ( मुलं ) …

मुलाने मात्र उघडं सगळं गाव भर फिराव पण मुलिच्या ड्रेस मधुन थोडा स्लिप चा बेल्ट बाहेर काय आला तिला बघ ईशारे देतिये म्हणुन संबोधित करणं …

त्याने मात्र गावभर पोरी फिरवायच्या पण एखाद्या मुलीचे काही मित्र असले तर तिला वैश्या म्हणायंच …

त्याने रात्र भर बाहेर फिरायचे पण एखादी मुलगी मात्र बाहेरून घरी यायला रात्र झालीस तर तिला रेट विचारायचे …

ति पातळ असली तरी टोमणे ,
जाड असली तरी टोमणे ,
ति काळी असली तरी तेच ,
ति गोरी असली तरी तेच ,
ति सलवार वर असली तरी छेडतात ,
जिन्स वर असली तरी छेडतात ,
ति शांत असली तरी बदनामी ,
ति मस्तीखोर असली तरी बदनामी…

आणि …

ति कुणाला बोलत नसली तर एवढा कशाचा एटिट्युड आहे त्या कुत्रीला असे म्हणुन बोलने आणि जर ती सर्वांशी बोलत असली तर ?
सर्वांना लाईन देते साली अशीच फालतू आहे . असे त्यांचे बोलने …

फेसबुक वर ऑनलाइन असेल तर सर्व तिला Timepass समजतात भले ती सामाजिक मुद्दे मांडत असेल तरी , राजकारणात , समाजात व इतर पुरुषांच्या सोबत काम करत असेल तर ती गाव भर फिरणारी , चारित्र्य हीन म्हणून तिच्याशी कोणी लग्न करत नाही , लग्न करून बाहेर गेली तरी घरात नवरा आणि बाहेर दुसरा असे म्हणून हिनवले जाते , लग्न न करता स्वतः च्या पायावर उभी असेल तरी , लग्न न करता सर्व काही भेटते मग लग्न का करेल ? असे म्हणून तिची निंदा नालस्थि केली जाते , तिला प्रत्येक बाजूने शारीरीक दृष्ट्या च पाहीले जाते , ना तिचे कर्तृत्व पाहिले जात ना तिचे मन …

आणि असला हा मानसिक बलात्कार स्त्री ला रोज सहन करावा लागतो …

पण या मध्ये चुक त्या पुरूष मंडळींची ( मुलांची ) नाही तर त्यांच्या सडक्या मेंदुची आहे. अहो एकदा निरिक्षण तर करा जे अवयव स्त्रियांना आहेत तसेच हुबेहुब पुरुषांच्या आई – बहिनींना आहेत …

काय फरक पडतो आई – बहिण आपली असो कि दुसऱ्याची तिची ईज्जत करा …

कुणालाही माझी ही पोस्ट अश्लील वाटली असेल , कारण आपल्या इथे जरी शिव्या स्त्रियां वरून दिल्या जात असल्या तरी त्या शिव्यांचा उल्लेख एक पुरूषच करत असेल तर लोकांच्या भुवया उंचावतात आणि आता ही बऱ्याच जणांच्या त्या उंचावल्याच असतील माझ्या ह्या पोस्ट मधील शिव्या वाचून पण …

जसे माज्याचे नग्न सत्य आहे ते त्यांच भाषेत त्यांच्या समोर आनले तर ते बरोबर वर्मी बसेल असे मला वाटते . आणि तरी कोणाला चुकीचे ,वाईट वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग …

माझा कुणालाही वैयक्तिक दूखावण्याचा हेतु अजिबात नाही …

समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा एक छोटासा प्रयत्न ….

चुकीचे वाटल्यास माफ करा मित्रहो, भावा – बहीणीं हो . थोडे शांत पणे विचार करा खरेच स्त्री ला आरोपीच्या पिंजऱ्यात पाहणाऱ्या ह्या पुरुष प्रधान समाज्यातील पुरुषाचे चारित्र्य 100% साफ असते का ? की पुरुष म्हणून जन्माला आले म्हणून सर्व माफ आणि स्त्री म्हणून ती जन्मभर गुलाम गुन्हेगारच …?

पुढच्या वेळेस कोणत्या ही स्त्री ला किंव्हा मुलीला जज करताना ,आई, बहिणी वरून शिव्या देतांना माझा हा लेख नक्की आठवाल अशी आशा करतो …!

दादासाहेब साळुंखे
( महामंत्री )
RPI मराठा आघाडी

Leave a Reply

Back to top button