Amalner

अवैध गौण खनिज वाहतूक पथकावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांची अमळनेरला भेट…

? Big Breaking..अवैध गौण खनिज वाहतूक पथकावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांची अमळनेरला भेट…

?️ अमळनेर तालुका तलाठी संघ अमळनेर,

?️ अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटना

?️ अमळनेर तालुका कोतवाल कर्मचारी संघटना यांनी दिले निवेदन

प्रा जयश्री दाभाडेअमळनेर

दि.04/03/2020 रोजी भरवस येथे रात्री 8:30 वाजता अवैध गौणखनिज वाहतुक
करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी म. तहसिलदार अमळनेर यांच्या तोंडी आदेशान्वये श्री…
धिरज देशमुख, श्री. अशिष पारधी, श्री. हर्षवर्धन मोरे श्री. प्रथमेश पिंगळे हे अवैध
गौणखनिज कारवाईस गेले असता त्यांचेवर बेटावद ते भरवस रसत्यावर प्राणघातक हल्ला
करण्यात आला आहे. तलाठी कर्मचाऱ्यांवर यापूर्वी देखील अशाप्रकारचे प्राणघातक हल्ले झालेले आहेत. सदरच्या घटनेच्या विरोधात अमळनेर शहरात तीव्र स्वरुपात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक पथकावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांची अमळनेरला भेट...

सदर घटनेबाबत मारवड पोलिस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दाखल करणेत आलेली आहे. सदर फिर्यादीचे अनुषंगाने तलाठी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपिंना जो पर्यंत अटक होणार नाही तो पर्यंत अमळनेर तालुका तलाठी संघटनेने सामुहीक काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी सदर निवेदनाचा
सकारात्मक विचार करावा व तलाठी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करणेबाबत स्तरावरुन सहा. पोलिस निरिक्षक, मारवड यांना निर्देश देणेत यावे.आरोपिना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.श्री-वाल्मिक पाटील श्री-संतोष कोळी श्री- व्ही.पी.पाटील.श्री- वाय.आर.पाटील श्री. योगेश व्ही. पवार श्री मुकेश एस देसले, श्री वाल्मिक एस पाटील, श्री.गणेश आर महाजन यांच्या सह्या आहेत.

अवैध गौण खनिज वाहतूक पथकावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांची अमळनेरला भेट...

?️ अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनने दिला पाठिंबा
सदर घटनेबाबत मारवड पोलिस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दाखल करणेत आलेली
आहे. सदर फिर्यादीचे अनुषंगाने महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना जो पर्यंत अटक होणार नाही तो पर्यंत अमळनेर तालुका तलाठी संघटनेने सामुहीक रजा टाकुन काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.सदर आंदोलनास महसूल कर्मचारी संघटनेचा पुर्णपणे पाठींबा असून महसूल कर्मचारी
एन आर ढोकणे,पी डी सूर्यवंशी,एच डी.कोळी,
एम जे काटे,बी एन काटे,एस गरूडकर,ए आर पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

अवैध गौण खनिज वाहतूक पथकावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांची अमळनेरला भेट...

?️ अमळनेर तालुका कोतवाल कर्मचारी संघटनने देखील दिला पाठिंबा…निवेदनावर मुकेश शिसोदे ,भिकन गायकवाड, सागर पाटील,प्रवीण शिरसाठ, प्रदीप,महाले,प्रदीप देसले,विवेक ठाकरे इ च्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button