Amalner

Amalner:सरस्वती आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा निकाल 92%..

Amalner:सरस्वती आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा निकाल 92%..

डीजीटी दिल्ली यांनी सर्व आयटीआय च्या घेतलेल्या परीक्षेचा निकाल तारीख 7 सप्टेंबर 2022 रोजी लागला त्यात सरस्वती आयटीआय देवळी अमळनेर या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा निकाल 92.20% लागला असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे सदर परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या अशी माहिती संस्थेचे सचिव कुवर मॅडम यांनी दिली विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री पी.एच. पाटील यांनी केले खेड्यापाड्यातील मुलांना ऑनलाइन आयटीआय ची ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बसून परीक्षा देणे हे अगदीच नाविन्यपूर्ण होते सदर सरस्वती आयटीआय देवळी येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वारंवार कम्प्युटरवर सराव घेऊन त्यांना योग्य ते कम्प्युटरचे ज्ञान प्राप्त केल्याने त्यांची कम्प्युटर ऑपरेट करण्याची ऑनलाईन परीक्षा देण्याची भीती तर गेलीच परंतु निकाल देखील 92.20% एवढा लागला त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होते आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button