India

Important: सेक्स्टॉर्शन म्हणजे काय? बळी पडण्याआधी जाणून घ्या..!

Important: सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?

गेल्या काही दिवसांपासून सेक्स्टॉर्शन हा शब्द वारंवार ऐकू येत आहे आणि याबद्दल ठिक ठिकाणी गुन्हे देखील दाखल होत आहेत. चला तर मग जाणून घेऊ काय हा प्रकार…

सेक्स + एक्स्टॉर्शन (Sex + Extortion) यावरून सेक्स्टॉर्शन हा शब्द आलाय. म्हणजे सेक्सचा वापर करत ब्लॅकमेल करून वा दबावाखाली आणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणं…

ज्या वेगाने इंटरनेट आणि ऑनलाइन चे जाळे पसरत आहे त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीतही झपाट्याने वाढ होतेयं. सायबर गुन्हेगार रोज नवनवीन पद्धतींचा वापर करत नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवतंय. यामध्ये ऑनलाईन फ्रॅड, हनीट्रॅप अशा गुन्ह्यांची चर्चा आहे. मात्र गेल्या काही महिन्यातच एक वेगळाच गुन्हा चर्चेत आलायं. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागतोय. हा गुन्हा म्हणजे सेक्सटॉर्शन. जाणून घेऊ सेक्सटॉर्शन म्हणजे काय, नेमका कसा घडतो हा प्रकार.

फेसबुक, व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. चित्रपट कलावांतापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून फसवणूक (सेक्सटार्शन) करण्याचा प्रकार सुरू आहे.

नवी दिल्ली,मुंबई,हैद्राबाद,गोवा,पुणे इ आहेत महत्वाची ठिकाणं जेथून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे….

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?

एक्सटॉर्शन म्हणजे खंडणी आणि त्याचप्रमाणे लैंगिकतेचा आधार घेऊन किंवा लैंगिक छळ केल्याचा बनाव करून उकळली जाणारी खंडणी म्हणजे ‘सेक्सटॉर्शन’. एखाद्या व्यक्तीचा फोटो अथवा व्हिडीओमध्ये छेडछाड करून त्याला नग्न करून हा फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढले आहेत.

हे अवश्य ध्यानात ठेवा

समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत जपून मैत्री करा.

अनोळखी व्यक्तीचे ‘व्हिडीओ कॉल’ स्वीकारू नका.

अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी आकर्षक तरुणींच्या चेहऱ्याचा वापर होतो.

एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला तर अधिक काळ बोलू नका.

लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी होते.

खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका.

सेक्सटॉर्शनच्या अशा शेकडो घटना 2021 पासून समोर आल्या आहेत. हा आकडा ज्यांनी समोर येऊन सायबर पोलिसांकडे तक्रार केली त्यांचा आहे. ज्यांनी तक्रार केली नाही अशांची संख्या अधिक असण्याची शक्यता सायबर पोलीस व्यक्त करतात.कारण बरेच लोक प्रतिष्ठा आणि इज्जती पोटी तक्रार दाखल करत नाही.

सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार देखील वाढलं आहे. सावज शोधून त्याला अडकवून पैसे वसूल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. याप्रकारांमुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय तर काही लोक बदनामीच्या भीतीमुळे नैराश्यात देखील जात आहेत.या नैराश्यातुन आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे.

असे लैंगिक शोषण टाळा

पॉर्न साइट्स सर्च करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा.
– ज्या वेबसाइटची URL लॉक करण्यापूर्वी बनवली आहे त्या वेबसाइटवर जा.
लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा.
– फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा.
जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

जमतारा नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आहे त्याप्रमाणे सॉफ्ट टारगेट शोधून लोकांना आर्थिक गंडा घातला जातो. यात मॅट्रोमोनियल साईटवरुन ओळख करुन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवण्याचे गुन्हे देखील अधिक आहेत.

सेक्स्टॉर्शनचे बळी ठरलेल्यांमध्ये 30 वयाच्या वरील पुरुषांचे तसेच खासकरुन लग्न झालेल्या पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

सेक्सटॉर्शनपासून वाचायचे कसे?

दिवसभरात आपल्याला शेकडो मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येत असतात. अनेक अनोळखी लोकांच्या फ्रेंण्ड रिक्वेस्ट सुद्धा आलेल्या असतात. त्यामुळे आपली फसवणुक टाळण्यासाठी सोशल मीडियावर वावरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर ती खात्री करुन स्विकारा किंवा ती स्विकारण्याचे टाळा.

अनोळखी नंबरवरुन मेसेज आला तर त्याची खातरजमा करुनच त्यावर रिप्लाय करा. अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला तर तो स्विकारु नका.

सेक्सटॉर्शनच्या केसेसमध्ये फसवणुक करणाऱ्याने असे व्हिडीओ कुठे पोस्ट केल्याचे फारसे दिसून येत नाही.

केवळ पैसे उकळण्यासाठी धमकावले जाते. त्यामुळे अशी फसवणुक झाली तर सायबर क्राईम ला तक्रार करा.

लोक टेलिग्राम, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर बिझनेस ग्रुप किंवा चॅनेल सुरु करतात. अनेकदा अशा ग्रुपची लिंक ओपन टू ऑल असते. यावर अनेकदा बाहेरच्या देशाचे नंबर देखील अॅड होतात. ते बिझनेस प्रपोझल पाठवतात. नंतर याची खात्री करण्यासाठी आपण व्हिडीओ कॉल करु असं सांगतलं जातं आणि व्हिडीओ कॉल घेतल्यानंतर समोरची व्यक्ती नग्न असते.

हा कॉल रेकॉर्ड केला जातो. नंतर तुम्ही बिझनेसच्या नावाखाली असं करायला सांगितलं असं म्हणत तो व्हीडिओ ग्रुपवर टाकण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारची फसवणूक गेल्या काही महिन्यांमध्ये वाढली आहे.

अनोळखी व्यक्तीशी व्हीडिओ कॉलवरुन संपर्क करताना सुरुवातीला तुमचा चेहरा न दाखवता आधी खात्री करुन घ्यायला हवी. किंवा कॅमेरा सुरुवातीला बंद ठेवून आधी त्या व्यक्तीबद्दल खात्री करायला हवी आणि मग व्हिडीओ ऑन करायला हवा.

”ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येतात त्यामध्ये कुठल्या प्रकराचा व्हायरस नाही ना हे पाहायला हवं. तुम्हाला एखाद्या अनोळख्या व्यक्तीकडून फेसबुकवरुन फ्रेण्ड रिक्वेस्ट आली असेल तर त्या व्यक्तीचं युआरएल आणि नाव सारखं आहे का हे तपासलं पाहिजे. त्याचबरोबर ते अकाऊंट कधी तयार केलं आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे.

एखाद्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून फसवलं तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला हवी. कारण त्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले तरी त्या व्यक्तीने तो व्हिडीओ डिलीट केला आहे याची तुम्ही खात्री करु शकत नाही. त्यामुळे आयुष्यभर तुम्हाला भीतीच्या छायेखाली रहावं लागेल. जर याबाबतची तक्रार दाखल केली तर हे प्रमाण कमी होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button