Amalner

Amalner: धनदाई महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप

Amalner: धनदाई महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप

कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव खेडी प्रज येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिवाजी शिबिराचे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय रावसाहेब के डी पाटील तर समारोप करते राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक श्री डॉ संजय सिंगाने सर तसेच संचालिका सौ प्रमिलाताई पाटील सौ रेखाताई पाटील सौ प प्रा नयनाताई पाटील प्राचार्य प्रमोद पवार तसेच खेडे गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ राहुल इंगळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तविकेमध्ये सात दिवसांमध्ये या शिबिरात केलेले श्रमदानाचा आढावा सांगितला तसेच या कार्यक्रमाचे समारोप करते डॉ संजय सिंगाने यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध शिबिर याबद्दल माहिती सांगितली आणि स्वयंसकांना या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान केले प्राचार्य डॉ प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले अध्यक्षीय भाषणात रावसाहेब केली पाटील यांनी श्रम संस्कार म्हणजे काय आणि महाविद्यालयीन जीवनात श्रमाला कसे महत्त्व आहे हे सांगितले व गावकऱ्यांचे सहकार्य बद्दल आभार मानले कुमारी वैष्णवी पाटील आणि रोहित खैरनार यांनी सात दिवसाचे शिबिरामधून मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य किशोर पाटील प्रशांत पाटील महादेव तोंडे महिला कार्यक्रमाधिकारी प्रा मीनाक्षी इंगोले प्रा कैलास पाटील यांनी हे शिबिर यशस्वी होण्याकरिता मेहनत घेतली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ सचिन नांद्रे राष्ट्रीय जिल्हा समन्वयक डॉ मनीष करंजे यांनी शिबिराला प्रेरणा दिली हे शिबिर यशस्वी होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे समसवय राहुल पाटील अक्षय पाटील रोहित खैरनार अमोल पाटील मानसी राजपूत वैष्णवी पाटील नेहा पाटील मयुरी पाटील विपुल महाजन इत्यादींनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button