kalamb

वाठवडा गावात अवैध दारू विक्री जोमात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, दारू विक्रीस ‘आशिर्वाद’ कोणाचा?

वाठवडा गावात अवैध दारू विक्री जोमात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, दारू विक्रीस ‘आशिर्वाद’ कोणाचा?

कळंब : तालुक्यातील मौजे वाठवडा गावात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचे निवेदन गावातील नागरीक मंगल निरंजन बनसोडे यांनी यांनी (२१ जुन ) तहसिलदार कळंब यांना दिले आहे.

निवेदनात म्हटलें आहे की मी वाठवडा येथील रहिवासी आहे माझ्या मालकीच्या शेतात कुटुंबासह वास्तव्यास आहे माझ्या शेजारील सरकारी कालव्याच्या बाजुला शिवाजी लाला काळे हे कुटुंबासह अतिक्रमण करून राहत आहेत ते राजरोज बेकायदेशीररित्या गावठी दारूविक्री व जुगाराचा व्यवसाय करत आहेत गावातील लोक दिवसरात्र दारू पिण्यासाठी तिथे येतात व दारू पिऊन भांडणे करतात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात मी दहा सदस्यांसह घरी वास्तव्यास आहे माझ्या राहत्या घरी लहान मुलांचा वृद्धासह महिलांचा समावेश आहे..

बेकायदेशीर दारू विक्रीमुळे व त्यातुन होणार्या शिवीगाळ व भांडण तंट्यामुळे माझ्या कुटुंबातील लहान मुलांना व महिलांच्या मनात भिती निर्माण झाली आहे असे निवेदन तहसिलदार कळंब यांना दिले आहे या विषयाच्या उचित कार्यवाहीसाठी तहसिलदार कळंब यांनी शिराढोन पोलीसांना पत्र देखील काढले होते परंतु आजतगायत मौजे वाठवडा गावातील अवैद्य दारू विक्री बंद झालेली नाही या अवैद्य दारू विक्रीस पोलीसांचा अभय आहे की अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे असे असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे

सदर बेकायदेशीर दारू विक्री तात्काळ बंद करावी व माझ्या कुटुंबाला होणारा त्रास थांबवावा अशी मागणी केलेली आहे

*चौकट*
वाठवडा गावातील अवैध दारू विक्री लवकरात लवकर बंद करून पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवण्याची गरज आहे तसेच यावर प्रशासनाने नाही अंकुश ठेवायला हवा

बालाजी गायकवाड
प्रदेश कार्यकारणी सदस्य
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button