kalamb

बंद असलेल्या शाळा सुरू करा,मानवहित लोकशाही पक्षाची मागणी

बंद असलेल्या शाळा सुरू करा,मानवहित लोकशाही पक्षाची मागणी

सलमान मुल्ला कळंब

कळंब : कोरोणा काळात बंद असलेल्या शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने कळंब तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोरणा काळात दोन वर्ष होऊन गेले तरी सूद्धा शाळा बंदच आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. तर यामध्ये अतिशय हालाकिच्या परिस्थितीत जिवन जगत असलेल्या गोरगरीब अभ्यासू विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होऊ लागलेआहे. तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खुपमोठा परिणाम शाळा बंद असल्याने होत आहे. शासनाच्या वतीने कोरोणामुळे शाळा बंद केल्या असल्याने आँनलाईन अभ्यास चालू करण्यात आला आहे.परंतु अनेक गरीब विद्यार्थ्यांना आँनलाईन अभ्यासाकरीता मोबाईल किंवा ईतर सुविधा उपलब्ध होत नसल्याने व गरिबी परिस्थिती असल्यामुळे मोबाईल किंवा इतर सुविधा विकत घेऊ शकत नसल्याने अभ्यासावर परिणाम होत आहे.त्यामुळे कळंब तालुक्यासह महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील गोरगरीब कामगार कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा स्मार्टफोन शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विलास भाऊ झोंबाडे, संदिप झोंबाडे, मच्छिंद्र माळी, यांच्या स्वाक्षर्या आहेत. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button