Delhi

?निर्भया बलात्कार प्रकरण ‘निर्भया’च्या दोषीची याचिका पटियाला उच्च न्यायालयाने फेटाळली

?निर्भया बलात्कार प्रकरण

‘निर्भया’च्या दोषीची याचिका पटियाला उच्च न्यायालयाने फेटाळली

प्रा जयश्री दाभाडे

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी विनय शर्मा याची याचिका दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने फेटाळली आहे.

मानसिक तणावाखाली असल्याने आपल्याला तात्काळ उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी याचिका विनय शर्माने केली होती जी कोर्टाने फेटाळली.

▪ काही दिवसांपूर्वी दोषी विनय शर्माने तुरुंगात भिंतीवर डोकं आपटलं होतं. यानंतर विनयच्या वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली.

▪ विनय प्रचंड तणावाखाली आहे आणि त्याला उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारांची गरज आहे, अशी मागणी विनयच्या वकिलाने याचिकेतून केली.

कोर्टाचे स्पष्टीकरण असे आहे की फाशीच्या शिक्षेमुळे दोषींची मानसिक स्थिती बदलू शकते. हे साहजिक आहे. दोषी विनयला आवश्यक आणि पुरेसे वैद्यकीय उपचार देण्यात आले असल्याने ही याचिका फेटाळण्यात येत आहे.

दरम्यान, विनयची याचिका म्हणजे शिक्षेतून पळवाट काढण्याचा मार्ग आहे, असा आरोप निर्भयाच्या आईने केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button